नवयुग शिक्षण संस्थेच्या प्रांगणामध्ये तालुकास्तरीय तीन दिवसीय शालेय कबड्डी स्पर्धा नुकत्याच पार पडल्या .
प्रतिनिधी – विकी ओहोळ
८४४६११९१५८/
दौंड – जिल्हा क्रीडा अधिकारी पुणे व जिल्हा क्रीडा परिषद पुणे आयोजित दौंड तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा सन 2023 -24 नवयुग शिक्षण संस्थेच्या स्वर्गीय लाजवंती भावनदास ग्यारेला माध्यमिक विद्यालयांमध्ये नुकत्याच पार पडल्या. मा.वीरधवल बाबा जगदाळे पाटील संचालक दौंड शुगर आलेगाव यांच्या शुभहस्ते या स्पर्धांचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी नवयुग शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा गुरुमुख नारंग . अजिंक्य येळे गटविकास अधिकारी पंचायत समिती दौंड संजय महाजन, गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती दौंड महेश चावले ,तालुका क्रीडा अधिकारी, सुदाम खैरे , विस्तार अधिकारी पंचायत समिती दौंड आदी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते.वय वर्ष गट 14, 17 ,19 मुले एकूण 125 संघांनी नाव नोंदणी केली होती तर मुलींच्या 75 संघांची नोंद झाली. वरील सामने दिनांक 4 सप्टेंबर 5 सप्टेंबर 6 सप्टेंबर असे तीन दिवस चालू होते. हे सामने यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता क्रीडा शिक्षक हनुमंत धालपे ,सचिन मेमाणे ,कैलास काशीद या शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब वागसकर सर व पर्यवेक्षक विजय वाघ सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या क्रीडा स्पर्धा दरम्यान विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या स्पर्धांना भेटी दिल्या यामध्ये मुलींच्या कबड्डी सामन्यांच्या उदघाटन प्रसंगी नानविज पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य समादेशक रामचंद्र केंडे , पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव प्रसाद गायकवाड व जिल्हा वार्तापत्रकाचे सहसंपादक विनायक सुंबे ,आदिनाथ थोरात, संघाचे सचिव अशोक भुजबळ शिर्के, दौंड तालुका क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आवारी , सचिव सुनील माने , ह भ प संजय वाबळे , दुर्योधन जठार आदी मान्यवरांचा समावेश होता या क्रीडा स्पर्धा सुरळीत पार पाडत असताना पंच म्हणून राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक 5 चे पोलीस जवान सुनील देवकाते प्रशांत पंडित निवृत्ती डवले विनोद वाळके गणेश वाघमोडे तुषार आडे यांनी काम पाहिले गुणलेखक म्हणून अजय निमोनकर क्षीरसागर अशोक गिरमकर पंकज सोनवणे संजय खामकर संजय पवार काशीद कैलास अखिल शेख तसेच महिला शिक्षिका रुकसाना सय्यद खातून बी सय्यद सैदाबानो शेख मदालसा गायकवाड यांनी मुलींच्या स्पर्धा पार पाडण्याकरिता सहकार्य केले फोटोग्राफीसाठी सुरज बनसोडे दीपक परदेशी भूषण उंडे यांनी काम पाहिले नवयुग शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गुरुमुख नारंग यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व स्पर्धा सुरळीत पार पडल्या सर्व यशस्वी खेळाडूंचे आणि क्रीडा शिक्षकांचे अध्यक्षांनी संस्थेच्या वतीने हार्दिक अभिनंदन केले व त्यांचा गुणगौरव केला तसेच पुढील निवडीकरिता हार्दिक शुभेच्छा दिल्या.