June 29, 2025 3:24 am

मंगळग्रह सेवा संस्था भारतीय सेवा रत्न पुरस्काराने सन्मानित

अपनी भाषा में पढ़े! Translate

पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना दिलिप बहिरम, गिरीश कुलकर्णी, शरद कुलकर्णी आदी

मंगळग्रह सेवा संस्था भारतीय सेवा रत्न पुरस्काराने सन्मानित

सामाजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी : भारतातील एकमेव सामाजिक संस्थेस मिळाला राष्ट्रीय पुरस्कार

अमळनेर – धार्मिक कार्यासोबतच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल येथील मंगळग्रह सेवा संस्थेस ग्लोबल स्कॉलर्स फाउंडेशन, पुणे तर्फे पद्भश्री गिरीश प्रभुणे यांच्याहस्ते भारतीय सेवा रत्न २०२३ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
पुणे येथील सयाजी हॉटेल येथे २७ आॅगस्ट रोजी आयोजित कार्यक्रमात संस्थेचे सह सचिव दिलिप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, जन संपर्क अधिकारी शरद कुलकर्णी, सेवेकरी प्रसाद खालकर, नितीन सोनवणे यांनी हा पुरस्कार स्विकारला.
संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाने सदर संस्थेमार्फत धार्मिक, सामाजिक, पर्यावरण, आरोग्य, शैक्षणिक आदी क्षेत्रात आगळ्यावेगळ्या पद्धतीने कार्य सुरु आहे. संस्थेच्या माध्यमातूनच जगातील एकमेव मंगळग्रह देवतेचे मंदिर विकसित झाले आहे. या मंदिरात जगभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात. सामान्य जनतेच्या जीवनात अमुलाग्र बदल घडविण्यासाठीही संस्थेने नाविण्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. त्यात आरोग्य, शासकीय योजना जनजागृती, शिक्षण,अंधश्रद्धा निर्मूलन,पर्यावरण,शेतीविषयक योजनांचा प्रचार व प्रसार आदी कार्यात संस्थेने वेगळा ठसा उमटविला आहे. या कार्याचीच दखल घेत ग्लोबल स्कॉलर्स फाउंडेशनतर्फे भारतीय सेवा रत्न २०२३ पुरस्कार देऊन संस्थेस गौरविण्यात आले.
ग्लोबल स्कॉलर्स फाउंडेशनतर्फे दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था, व्यक्तींना पुरस्कार दिला जातो. या वर्षीचा भारतातील सर्व सेवाभावी संस्थामधून एकमेव मंगळग्रह सेवा संस्थेस हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी ग्लोबल स्कॉलर्स फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील बेळगावे व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

मंगळग्रह सेवा संस्थेस आतापर्यंत मिळालेले पुरस्कार
चार आयएसओ मानांकने (भारतातील एकमेव संस्था) -२०२१
महाराष्ट्र शासन पर्यटन विभागाचा ‘पर्यटन मित्र’ पुरस्कार -२०२१
पाणी फाउंडेशनतर्फे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमाकांचा पुरस्कार
-२०१८
महाराष्ट्र शासन, कृषी विभागातर्फे सन्मानित -२०२२
गुगलतर्फे ५ पैकी ४.६ रेटिंग देऊन सन्मानित -२०२३
भारतीय सेवा रत्न पुरस्कार -२०२३

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!