उल्हासनगर महानगर पालिका म्हणजे मुकी बिचारी गाय कोणीही काढा दुध कितीही करा अत्याचार !
नाही देत हुंकार, नाही फोडत हंबरडा, कारण मालक आहे त्याचा रेडा !
उल्हासनगर महानगरपालिका हा भ्रष्टाचा-यांचा अड्डा झाला आहे, या अड्डयावर फक्त लोकप्रतिनिधीच नाहीत, फक्त ठेकेदारच नाहीत,फक्त दलालच नाहीत तर शासनाकडून गलेलठ्ठ पगार व भत्ते घेणारे अधिकारी आहेत, प्रतिनियुक्तीवरील शासनाचे जावई सुनांबरोबरच मुख्यमंत्र्यांच्या पाळीव श्वानाने देखील या अड्डयावर आपला मुक्काम ठोकला आहे.
या श्वानाने महापालिकेच्या नगर रचना विभागात आपला मुक्काम ठोकला तर ठोकला त्याच बरोबर आपली काही अनारौस अपत्यंही येथे मोकाट सोडून दिली. तो स्वत: पोट फुटेस्तो खा-खा खातो व त्यातून या अनारौस पुत्रांना पोसत आहे. त्या बदल्यात त्या श्वानाला ते कमालीची वसुली करून देतात.
हरामाचे ७५ लाख रूपये हॉस्पिटलच्या घश्यात घालून जीवदान मिळवून आलेला हा श्वान गुपगुमान घरी बसण्याऐवजी येथे विष्ठा चाटण्यासाठी पुन्हा आला. दरम्यान त्याच्या पाच अनारौस पुत्रांचेे बिंग फुटताच एक पकडला गेला तर चार दुम दबाकर भाग गये. या अनारौस पुत्रांच्या बचावासाठी हा श्वान फिटनेस सर्टिफिकेट घेऊन पुन्हा अड्ड्यावर आला.
महापालिकेचे आयुक्त बिन कामाचे फुल अधिकारी. निर्णय घेण्याची क्षमता नसलेले हे आयुक्त गुन्हेगारांच्या पाप राशींवर पांघरूण घालण्यात निष्णात आहे. प्रियंका राजपुतची वित्तिय अनियमितता व घोटाळा असो, कि दीपाली पवार या बनावट सफाई कामगारावरील फौजदारी कारवाई असो, सुरक्षा रक्षकांचा हजेरी घोटाळा, सरकारी भुखंडावरील अतिक्रमणे, रमेश चव्हाणच्या अवैध बंगल्याची रिअसेसमेंट करणे, एमआरटीपी दाखल करणे व दंडात्मक मालमत्ता कर वसुली करणे, बोगस सफाई कामगार ; कोणत्याही बाबतीत कारवाईच्या नावाने नन्नाचा पा़ढा ठरलेला व चौकशीचा वांझोटा फार्स !
प्रशासक व आयुक्त म्हणून तुम्हाला रक्षणकर्ते म्हणून शासन पोसत असताना तुम्ही भक्षणकर्ते होता ? “दे टक्का बिनधास्त मारतो शिक्का !” अशी अवस्था महापालिकेच्या सर्वच विभागांची झाली आहे. प्रशासक व आयुक्त या नात्याने फक्त डोळेझाक करण्यासाठी वेतन देत नाही. कलानी सोसायटीला रस्त्यासाठी प्रस्तावित जागेवर इमारत बनविण्यासाठी परवाना देणारा प्रकाश मुळव्याधी, असंख्य नकाशे डोळे झाकून मंजूर करणारा मुळव्याधी, बपौत्ती समजून टिडिआर बहाल करणारा हा परंप्रकाशित प्रकाश मुळव्याधी आयुक्तांना याची कृष्णकृत्यं दिसत नाहीत कि बुरा मत देखो ! म्हणत डोळ्यांवर झापडं लावून बसले आहेत.
साहेब, तुम्हाला कामाचा पगार मिळतो, तुम्हाला प्रशासनावर नियंत्रण ठेवण्यासाठी पगार मिळतो, तुम्हाला मालमत्ता कर चोरी व शासकिय मालमत्ता व भुखंडांचे संरक्षण करण्यासाठी वेतन मिळते. ही सर्व कर्तव्य पार न पाडता आपण वेतन व भत्ते घेत असाल तर ती हरामाची कमाई मानली जाईल. तुमच्या हाती एकहाती सत्ता आहे, महापालिकेवर आपले १०० % नियंत्रण असले पाहिजे. परंतू तसे दिसत नाही. समाज मंदिरांवर रमेश चव्हाण सारख्या नागांनी विळखा घातला आहे, महापालिका भु़खंड पे एण्ड पार्कच्या माध्यमातून समाजकंटकांच्या कमाईचे साधन म्हणून बहाल केले आहेत.त्यावर नियंत्रण करण्याची धमक तुमच्यात नाही. कोणत्या अधिकाराने तुम्ही वेतन भत्ते घेता ?
तुमच्या महापालिकेतील नगर रचना विभागात पाच अनधिकृत व्यक्ति बिनधास्त वावरतात, महत्वाच्या व गोपनीय फाईली हाताळतात,त्यांचा बाप करोडोचा भ्रष्टाचार करून ताव मारत आहे, आणि ते तुम्हाला दिसत नसेल तर तुम्हाला काय उपमा द्यावी.* बरं चला तुम्ही मिंधे झाला असाल म्हणून ते तुम्हाला दिसले नसेल परंतू सत्ताधारी पक्षाचा घटक असलेल्या प्रहार जनशक्तिचा जिल्हा अध्यक्ष अॅड.स्वप्नील पाटील या पाच लोकांचे नागडे सत्य जगासमोर आणतो तरी तुम्ही मख्खपणे पाहत बसता ? बेकायदेशीर कृत्य करणारा प्रकाश मुळव्याधी व त्याच्या पाच अनौरस पुत्रांवर फोजदारी कारवाई करताना तुमचे हात का कापतात ?
तुम्ही कोणाच्या तरी ताटा खालचे मांजर असलात तरी तुम्ही शासनाचे अन्न खाता हे तुम्ही कसे विसरता?
तुमच्या या नाकर्तेपणामुळे सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील पाटील यांना बेमुदत उपोषण करावे लागत आहे.
३१ ऑगस्ट पुर्वी आपण फौजदारी
कारवाई करून आपली क्षमता व मर्दुमकी सिद्ध करा. तसे जर झाले नाही तर मला वयाच्या ६७ व्या वर्षी स्वप्नील पाटील यांच्या लढ्यात सामिल व्हावे लागेल व मग तुमची खैर नसेल. तुमच्या कारकिर्दीचा अंत आमच्या हातून होणे विधीलिखित असेल तर तुमचाही नाईलाज आहे.
दिलीप मालवणकर
९८२२९०२४७०
३० ऑगस्ट २०२३