देशभरातील सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मोदी सरकारने सर्वसामान्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. देशातील महागाई कमी व्हावी या अनुषंगाने मोदी सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात मोठी कपात केली आहे.
अमळनेर विक्की जाधव..
विशेष म्हणजे उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. देशात प्रचंड महागाई वाढली आहे . गेल्या काही वर्षात घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात तर अतिशय जास्त वाढ झाली होती. त्यामुळे सर्वसामान्य नागरीक सातत्याने याबाबत तक्रार करताना दिसत होता. देशातील घरा_घरातील महिला या गॅस सिलेंडरच्या दराबाबत तक्रार करताना दिसत होत्या त्यामुळे अनेकदा मोदी सरकारवर अनेकांनी टीका केली होती.
अखेर सर्वसामान्यांची महागाईच्या तक्रारीची गंभीर दखल घेत केंद्र सरकारने हे दर कमी करत घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठी घट करण्याचा निर्णय घेतला आहे.