November 22, 2024 4:50 am

अ’. ब’.ब”‘ एव्हड्या दा प्रवेश नाकारला..??

अपनी भाषा में पढ़े! Translate

भारतीय जनता पक्षातील एका पुढाऱ्याच्या राष्ट्रवादी (श.प.ग.) प्रवेश नाकारला गेला असल्याच्या आज अमळनेर शहरासह तालुक्यात चांगलेच चर्चेला उधाण आले आहे.

अमळनेर : विक्की जाधव.

काँग्रेस मधून भाजपात गेलेल्या एका पुढाऱ्याने बऱ्याच वेळी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष कार्यालय गाठून राष्ट्रवादी प्रवेशासाठी प्रयत्न केले असल्याचे कळते.

मात्र आज तयारी निशी मुंबई येथे जाऊन राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचे ठरवले होते. मात्र अमळनेर तालुक्यातील स्थानिक राष्ट्रवादी कार्यकर्ते व पदाधिकारी यांना कळताच प्रदेश पातळी वर संपर्क साधला असता यांच्या पक्ष प्रवेश झाल्यास प्रखर विरोधाने आम्ही सामूहिक रित्या राजीनामा  देऊ, त्या नंतर या भाजपा पदाधिकाऱ्यांनी प्रदेश कार्यालयातून काढता पाय घेतला शेवटी प्रवेश नाकारला गेला असल्याचे सांगण्यात येत आहे.ह्या  बातमी मुळे अमळनेरात सकाळपासून चर्चेला जोरदर उधान आले. तर संबंधित भाजप पदाधिकारी आणि आमच्या सूत्रांकडून अशी माहिती मिळाली की, ते त्या ठिकाणी त्यांच्या वैयक्तिक कामानिमित्त भेटण्या साठी गेले होते. कोणत्याही प्रवेशाचा विषय किंवा ह्या विषयावर चर्चा झाली नसल्याचे आमच्या सूत्रांनी सांगितले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!