करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड):- पांडे ते गुळसडी हद्दीमध्ये 100 ब्रास परवानगी घेऊन पाच ते सहा हजार अवैधरित्या मुरूमाचे उत्खनन होत असलेली तक्रार मनसे शहर उपाध्यक्ष यांनी करमाळा तहसीलदार यांच्याकडे केली आहे. सदर निवेदनामध्ये संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे.
यावेळी आलाट यांनी सांगितले की, गुळसडी खंडागळे वस्ती येथून मुरूम उचलण्याचे काम चालू आहे सदर १०० ब्रास मुरूमाची परवानगी घेतलेली आहे परंतु आत्ता पर्यंत पाच ते सहा हजार ब्रास मुरूमाचे अवैध उत्खनन केलेले आहे हे मुरूम उचलण्याचे काम गावातील शेतकऱ्यांना दमदाटी करून तसेच पैशाचे आमिष दाखवून लोकांना धमकावून मुरुमाचे उत्खनन करीत आहेत तसेच शासकीय फॉरेस्ट विभाग, मौलाली नगर, श्री देवीचामाळ, गुळसडी धायखिंडी, पांडे, रोशेवाडी,कर्जत रस्ता, देवळाली असे अनेक ठिकाणांहून मुरूम उचलण्याचे उत्खनन होत असल्याने संबंधित व्यक्तीवर व त्यांच्या वाहनांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसे शहर उपाध्यक्ष करण आल्हाट यांनी निवेदनाद्वारे केली आहे.