June 30, 2025 5:50 pm

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त चव्हाण महाविद्यालयात अत्याधुनिक व्यायाम शाळेचे उद्घाटन

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) :- २९ ऑगस्ट हा दिवस हॉकी खेळाचे जादूगार ध्यानचंद यांचा जन्मदिन राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. याचे औचित्य साधून यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात विद्या विकास मंडळाचे सचिव मा. विलासराव घुमरे सर यांचे हस्ते अत्याधुनिक व्यायाम शाळेचे उद्घाटन करण्यात आले . त्याचबरोबर मॅटवरील कबड्डी क्रीडांगणाचे उद्घाटन मा. मिलिंद फंड सर , अध्यक्ष विद्या विकास मंडळ व विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी प्रशस्त अभ्यासिकेचे चे उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष मा. तात्यासाहेब मस्कर यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी विजयश्री सभागृहात गुणवंत क्रीडापटूंचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .एल. बी.पाटील हे होते . अध्यक्षीय मनोगतात पाटील सर म्हणाले की ध्यानचंद हे हॉकी खेळ स्वतःसाठी खेळले नसून ते देशासाठी खेळले , ज्यांना जर्मनीचे हुकूमशहा हिटलर यांनी जर्मनीचे नागरिकत्व देण्याचे व जर्मनीसाठी खेळण्याचे आवाहन केले होते. परंतू ध्यानचंद यांनी हिटलर यांचा प्रस्ताव नाकारून आपल्या देशावरील प्रेमाचे दर्शन घडविले. यावेळी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड सर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले .त्यावेळी ते म्हणाले की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर खेळासही महत्त्व द्यावे . कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ.अतुल लकडे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रा. अभिमन्यू माने यांनी व्यक्त केले. सदर कार्यक्रमास विद्या विकास मंडळाचे विश्वस्त श्री. चंद्रशेखर शिलवंत , सहसचिव मा. विक्रमसिंह सूर्यवंशी वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ . अनिल साळुंखे कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक , तसेच श्री प्रकाश झिंजाडे उपस्थित होते. यावेळी श्री. कांबळे व श्री.दळवी या पालकांचाही सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमास वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विभागातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!