June 30, 2025 11:21 pm

करमाळा – कोर्टी रस्ता बनतोय अपघाताचे प्रवण क्षेत्र (पिंपळवाडी च्या वृद्धाचा झाला अपघात)

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) :- करमाळा – कोर्टी रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आल्याने वाहन चालक बेफाम होऊन वाहने चालवित आहेत. आज दि.२९/०८/२३ रोजी एक वाजण्याच्या सुमारास यशकल्यानी संस्थे पासुन काही अंतरावर पिंपळवाडी, ता. करमाळा येथील वृध्द रस्त्याच्या बाजूला उभे असताना रोशेवाडी कडून येणाऱ्या भरधाव दुचाकीने त्यांना धडक दिली. सदर दुचाकी अपघात झाल्यानंतर काही अंतर पार करून पुढे गेली यावरून दुचाकीच्या वेगाचा अंदाज येतो. वेळ आली होती पण काळ आला नव्हता असे बोल यावेळी प्रत्यक्षदर्शिंच्या तोंडून निघाले.

या अपघाता मध्ये वृध्द व्यक्तीच्या पायाला मोठी दुखापत झाली असुन त्यांना तात्काळ रुग्णालयात उपचारा साठी दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर आहे.
सदर रस्त्यावर वारंवार दुर्घटना घडत असुन सार्वजानिक बांधकाम विभाग मात्र सोयीस्कररीत्या डोळेझाक करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.

मध्यंतरी नवभारत इंग्लिश स्कूल व नोबल इंग्लिश स्कूल या ठिकाणी दोन्ही बाजूने चार चार गतिरोधक बसविणे व पुढे शाळा आहे वाहने सावकाश चालवा आशा आशयाचे सूचना फलक लावण्यासाठी शिवसेना महिला तालुका प्रमुख प्रियांका गायकवाड यांनी सार्वजनिक बांधकाम अभियंता यांना प्रत्यक्ष लेखी निवेदन दिले होते. तद्नंतर गायकवाड यांनी पुन्हा अभियंता यांना संपर्क साधून काम करण्याबाबत सुचित केले असता त्यांनी सांगितले की, रंभापुरा येथील पुलाचे काम होताच सरद गतिरोधक बसविणेचे काम करीत आहोत असे अभियंता यांच्याकडून सांगण्यात आले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!