शेटफळगडे येथे एकाला चाकूचा धाक दाखवत तब्बल 82 हजार रु लुटले;भिगवण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
(निलेश गायकवाड )
इंदापूर-(bhigwan) इंदापूर तालुक्यातील शेटफळगडे येथे चाकूचा धाक दाखवत लामजेवाडी येथील नागरिकाला दोन अनोळखी व्यक्तींनी पाळत ठेऊन पाठलग करत रस्त्यात अडवून तब्बल 82 हजार रु किमतीची रोख रक्कम हिसकावून लंपास केली.
भिगवण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार काल दि.28 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11.40 वा वेळी शेटफळगडे येथील भिगवन बारामती रोडवर बंद असलेल्या गायकवाड पेट्रोल पंप च्या 200 मिटर अंतरावर सदर घटना घडली. यामध्ये श्री संतोष बाळासो निगडे वय 31 वर्ष. व्यवसाय नोकरी रा.लामजेवाडी.निगडे हे शेटफळगडे येथून लामजेवाडी कडे जाताना यांच्याकडील रोख रक्कम 82 हजार रु. दोन अनोळखी व्यक्तींनी नंबर नसलेली पॅशन मोटारसायकल वरून येऊन चाकूचा धाक दाखवत रोख रक्कम लंपास केली वा तेथून पळ काढला.सदर घटणेबाबत निगडे यांनी भिगवन पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच भिगवण पोलिसांच्या वतीने नाकाबंदी करून चोरांची शोध मोहीम सुरु ठेवली भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पोलीस खाडे हे करत आहेत.