अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेरची सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करणे साठी जोरदार तयारी व जिल्हाध्यक्षांचे मार्गदर्शन.
अमळनेर -दिनांक २७ ऑगस्ट२०२३ रोजी अखिल भारतीय ग्राहक पंचायत ही उज्वल परंपरा असलेली संघटना यावर्षी सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. त्यासाठी अमळनेर येथे तातडीची आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष डॉ अनिल देशमुख यांचे स्वागत करताना जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सदस्य श्री नरेंद्र पाटील समवेत जिल्हा उपाध्यक्ष दिनेश तायडे जिल्हा सचिव ॲड सुभाष तायडे,तालुका पालक मकसुद बोहरी ,तालुका अध्यक्ष व प्रांत महिला प्रमुख ॲड.भारती अग्रवाल,उपाध्यक्ष सौ. स्मिता चंद्रात्रे,सहसचिव सौ. ज्योतीभावसार ,कोषाध्यक्ष सौ वनश्री अमृतकर , श्रीमती विमल मैराळे, रोटेरियन नूतन सदस्य श्री महेश पाटील, साहित्य लेखक व कवी गोकुळ जी बागुल , शांतीलाल रायसोनी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
सदरचे सभेत उपस्थित मान्यवरांचे हस्ते ग्राहक तीर्थ नानासाहेब बिंदू माधव जोशी यांचे माल्यारपर्ण करून प्रतिमा पूजन करण्यात आले.त्यानंतर अमळनेर तालुक्याचे माजी आमदार खानदेश मुलुख मैदान तोफ म्हणून सर्व महाराष्ट्राला परिचित असलेले दिवंगत कै. साथी बापूसाहेब गुलाबराव पाटील यांच्या स्मृतींना उजाळा देत जिल्हाध्यक्ष डॉ.अनिल देशमुख यांनी मनोगत करीत अखिल भारतीय ग्राहक पंचायत तर्फे आपल्या अतीव दुःख व्यक्त करीत भावना व्यक्त केल्यात व त्यानंतर त्यांना सर्व उपस्थितांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
त्यानंतर अमळनेर तालुका पालक व जिल्हा सहसंघटक मकसूद बोहरी यांनी प्रास्ताविक केले. तालुका अध्यक्ष ॲड.भारती अग्रवाल यांनी अमळनेर तालुक्याचे सुवर्णमहोत्सवी वर्ष निमित्त करावयाचे कामाचा अहवाल सादर केला.
सदरच्या बैठकीत डॉ.अनिल देशमुख यांनी नूतन सदस्यता नोंदणी ,संकलन निधी व स्मरणिका जाहिरात तसेच अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त दिनाक ८ सप्टेंबर ते १०सप्टेंबर २०२३ या दिवशी राष्ट्रीय स्तरावरील अधिवेशन ,तसेच मध्य महाराष्ट्र प्रांत यांचे ओझर तालुका जुन्नर येथील आयोजित आधेवेशन व त्या संबंधीचे दायित्व कार्य व अखिल भारती ग्राहक पंचायत ची एकंदरीत सर्व कार्यप्रणाली यावर सविस्तर असे मार्गदर्शन केले . अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर तालुक्याचे कार्याबद्दल समाधान व्यक्त करीत प्रत्येक सभासदांनी नूतन दहा अभ्यासू व जिज्ञासू सदस्य जोडावेत . ह्या सुवर्ण महोत्सवी वर्षात जास्त नवीन सभासद जोडावेत असेही त्यांनी आवाहन केले.बँक सायबर क्राईम समिती प्रमुख विजय शुक्ला यांनी ग्राहक हितार्थ कार्याचा , परिवहन ,भूमापन विभाग ,वीज वितरण आदी स्थरावर केलेल्या कार्याचा प्रगती आलेख नमूद करीत अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे नियुक्तीपत्र ,आय कार्ड , सर्व पदाधिकारी यांचे नामोलेख असलेले लेटर हेड याची मागणी करत प्रस्ताव मांडला .
मकसूद बोहरी यांनी भारतीय चांद्रयान -३चे चंद्रावर अर्थात दक्षिण ध्रुवावर इस्त्रोने अगदी अलगदपणे उतरविला त्या बद्दल अथक परिश्रम घेतलेले थोर शास्त्रज्ञ व त्यांना प्रोत्साहन देणारेआदरणीय पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी यांचे हार्दिक अभिनंदनाचा ठराव मांडला त्यास सर्वच उपस्थितांनी उत्सपूर्त टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद देत अनुमोदन दिले. सूत्रसंचलन सौ.वनश्री अमृतकर व आभार प्रदर्शन सहसचिव सौ.ज्योती भावसार यांनी केले. अशी बातमी पी आर ओ जयंतीलाल वानखेडे कळवितआहे.