June 29, 2025 11:00 am

पत्रकार संदीप महाजन यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध…. भारतीय पत्रकार संघ दौंड आक्रमक.

अपनी भाषा में पढ़े! Translate

पत्रकार सुरक्षित कधी होणार….
पत्रकार संदीप महाजन यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध…. भारतीय पत्रकार संघ दौंड आक्रमक.
सत्तेची नशा अशी असते का ??

प्रतिनिधी – विकी ओहोळ
8446119158
दौंड – जळगाव जिल्हा येथील पाचोरा तालुक्यातील पत्रकार संदिप महाजन यांच्यावर आमदार किशोर पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्राणघातक हल्ला करून भर रस्त्यात मारहाण केली.
पत्रकाराला फोनवर आई- बहिणी वरून शिवीगाळ करायची, मारण्याची धमकी द्यायची,दुसऱ्या दिवशी त्या पत्रकाराला गुंड पाठवून मारहाण करायची ..का ? तर त्याने विरोधात बातमी छापली म्हणून….
विशेष म्हणजे ज्या चौकात मारहाण झाली त्या चौकाला या पत्रकाराच्या स्वातंत्र्यसैनिक वडिलांचे नाव दिलेले आहे.ही घटना बघून स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या डोळ्यात देखील नक्कीच पाणी असेल.
सत्ताधाऱ्यांना सत्तेची नशा अशी असते का? लोकशाही मूल्यांना , स्वातंत्र्यासाठी झिजलेल्या कुटुंबांना देखील सन्मान नसतो का ? हा प्रश्न आज सर्वसामान्य जनता विचारत आहे.
लवकरात लवकर कारवाई न झाल्यास भारतीय पत्रकार संघ दौंड तालुका व पुणे जिल्ह्याच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदन भारतीय पत्रकार संघ दौंड यांच्याकडून दौंड पोलीस स्टेशन यांना देण्यात आले.
यावेळी भारतीय पत्रकार संघाचे व इतर अनेक पत्रकार उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!