नविन भारतीय कायदे, गुन्हेगारी कायद्यांमधे आमुलाग्र बदल..!
संसदेत ३ नवे कायदे आणले गेले जे प्रस्ताव मान्य झाल्यानंतर नोटीफिकेशन नंतर लागू होतील.
हे कायदे ब्रिटिश सरकारने १८६०, १८७२ व १८९८ मध्ये ब्रिटिश पार्लमेंट मधे पास होऊन भारतात लागू केले गेले जे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ,
किमान १९५० साली वा नंतर लगेच बदलणे अपेक्षित होते ते आज ७३ वर्षांनंतर घडलंय.
नावापासून ते कायद्यांपर्यंत सर्व भारतीय करण झाले आहे ऊदा.
ईंडीयन पीनल कोड, ज्याच्या नावातंच पिनलाईज म्हणजे शिक्षा करणं आहे ( ब्रिटीश कालीन संदर्भ) तो आता भारतीय न्याय संहीता असेस.
क्रिमीनल प्रोसीजर कोड ( जो ब्रिटिश काळात ज्याच्यावर आरोप आहे त्याला अपराधी समजून बधीतलं जात होतं) ज्याचं नाव आता ” भारतीय नागरीक सुरक्षा संहीता” म्हणजे नागरीकांना सुरक्षा देण्यासाठी प्राधान्य देण्यावर असेल