आ. किशोर पाटील यांच्यावर कडक कारवाई करा – बारामती तालुका मराठी पत्रकार संघाची वडगाव पोलीस स्टेशन येथे मागणी

अपनी भाषा में पढ़े! Translate

आ. किशोर पाटील यांच्यावर कडक कारवाई करा – बारामती तालुका मराठी पत्रकार संघाची वडगाव पोलीस स्टेशन येथे मागणी

बारामती (सह – संपादक – संदिप आढाव)
पाचोरा येथील पत्रकार संदिप महाजन यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आ. किशोर पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांवर पत्रकार हल्ला विरोधी कायद्यांतर्गत कडक कारवाई करा अशी मागणी बारामती तालुका मराठी पत्रकार संघाने केली आहे.

बारामती तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हेमंत गडकरी यांच्या नेतृत्वाखाली संघाच्या शिष्टमंडळाने वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात आ. किशोर पाटील यांच्यावर कारवाई करण्यासंबंधी निवेदन दिले.

यावेळी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे तालुका निमंत्रक राजेश वाघ, जिल्हा कार्यकारिणी सदस्य चिंतामणी क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी संघाच्या शिष्टमंडळाने पत्रकारांवर सातत्याने होत असलेल्या हल्ल्याबाबत आक्रमक भूमिका घेतली. पत्रकारांवरील हल्ले पुढील काळात खपवून घेतले जाणार नाहीत अशी भूमिका घेतली. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन काळे यांनी निवेदन स्वीकारले.
यावेळी बारामती तालुका मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संभाजी काकडे, कार्यकारिणी सदस्य अमोल गायकवाड, सुनील जाधव, संतोष भोसले, सोमनाथ लोणकर उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!