“तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत” स्वामी विवेकानंद शाळेला यश…

अपनी भाषा में पढ़े! Translate

“तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत” स्वामी विवेकानंद शाळेला यश…

अमळनेर – जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव व अमळनेर तालुका क्रीडा समिती अंतर्गत शालेय बुद्धिबळ स्पर्धा दिनांक 9 व 10 ऑगस्ट 2023 रोजी साने गुरुजी विद्यामंदिर येथे 14 वर्षे आतील मुलां मुलींची स्पर्धा घेण्यात आली. यात स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल येथील विद्यार्थी वंदन नीरज अग्रवाल तसेच मनस्वी विनोद पाटील या दोघांनी चार राऊंड जिंकत प्रथम स्थान प्राप्त केले. त्यामुळे या विद्यार्थ्यांची “जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे .यासाठी क्रीडा शिक्षक सुनील करंदीकर व योगेश पाटील यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांच्या यशासाठी शाळेचे चेअरमन नीरज अग्रवाल , मुख्याध्यापक हेमंतकुमार देवरे व उपमुख्याध्यापक विनोद अमृतकर यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले व आत्म मनोबल वाढवून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!