ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत आलेल्या कृषी कन्यांचे गुरव पिंप्री गावात स्वागत
प्रतिनिधी संदीप कायगुडे
कर्जत:महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) च्या अंतर्गत डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय बारामती येथील चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थिंनींचे गुरव पिंप्री गावात ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाअंतर्गत माती परिक्षण, बीज प्रक्रिया, पाणी व्यवस्थापन, किडरोग नियंत्रण व औषध फवारणी, ठिबक सिंचन पद्धत, शासकीय योजना व सबसिडी , पशुपालन,शेतीतील अत्याधुनिक तंत्रज्ञानाबद्दलची माहिती, शेती विषयी बँकीय सेवा पद्धती व सबसिडी पद्धती या विषयी कु.प्रीतम आल्हाट, रुचिता दौंडकर, तृप्ती कादे, प्रणोती पाटील स्नेहल साळुंखे,संस्कृती जाधव या कृषीकन्यांनी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीचे चेअरमन मा. राजेंद्र पवार उपस्थित होते.
या कार्यक्रमाला सरपंच गीतांजली सूर्यवंशी, उपसरपंच सागर गंगावणे, ग्रामसेवक गायकवाड एन. आर. तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमात कृषी कन्यांनी ग्रामस्थांना संस्थेचे प्रतिक आसलेले विविध फळांची रोपटे वाटप केले. यासाठी संस्थेचे मुख्य अधिकारी मा.नलावडे, कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक एस. पी. गायकवाड , प्रा. एस. व्ही. बुरुंंगले यांनी याविषयी मार्गदर्शन केलै.