अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस शिक्षा –
प्रतिनिधी मयुर पाटील
देवगाव ता पारोळा येथील आरोपी नामे संतोष मुरलीधर पाटील वय 44 वर्ष याने सन 2018 मध्ये अल्पवयीन मुलगी वय 9 वर्ष ही घरात एकटी असतांना तिला कुरकुरे आणण्याचे कारण सांगून तिचा विनयभंग केला त्याबाबत परोळवू स्टे येथे गु र न 162/2018 कलम 354, 354अ ,पोकसो,सहकलम अट्रोसिटी अन्वये गुन्हा दाखल असून नमूद आरोपीस अटक करण्यात आली असून तपास Dysp रफिक शेख अमळनेर यांनी तपासबक्रून आरोपपत्र सादर केले असता मा सेशन कोर्ट श्रीमान गायधने साहेब अमळनेर यांनी नमूद आरोपीस आज रोजी कलम 354IPC मध्ये तीन वर्ष शिक्षा व 500/- रुपये दंड,दंड न भरल्यास तीन महिने शिक्षा तसेच पोक्सो कायद्यान्वये पाच वर्ष शिक्षा व 500/-RUPYE दंड,दंड न भरल्यास सहा महिने शिक्षा,तसेच अट्रोसिटी कायद्यान्वये पाच वर्ष शिक्षा व 500/- रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने शिक्षा देण्यात आली आहे,सरकारी वकील किशोर बागुल यांनी तसेच पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शन खाली ASI उदयसिंग साळुंके यांनी पैरवी अधिकारी म्हणून कामकाज पाहिले आहे,नमूद आरोपीची सन जेल जळगाव येथे रवानगी करण्यात आली आहे.