June 29, 2025 8:04 am

महाघोटाळेबाज महानगर पालिका -लेखमालिका- भाग 13 वा.

अपनी भाषा में पढ़े! Translate

महाघोटाळेबाज महानगर पालिका -लेखमालिका- भाग 13 वा.

हा लेख मी २०१९ साली लिहिला होता. त्याची महालेखाकार मुंबई ( CAG ) ने दखल घेऊन महापालिकेवर ताशेरे ओढले होते.

माझा त्यावेळचा लेख जसाचा तसा व कॅगचा अहवाल खाली दिलेला आहे.

अंगणवाडीतील बालकांच्या नांवे भ्रष्टाचार करणारे नराधम
कायद्याच्या कचाट्यातून वाचता कामा नयेत !

महिला व बालकल्याण समितीच्या अंगणवाडी साठी साहित्य पुरविण्याच्या निविदेतील महाघोटाळ्याबाबत मी गेल्या महिन्यात गौप्यस्फोट केला होता.महिला व बालकल्याण समिती दरवर्षी 18 ते 24 लाखांची निविदा उपरोक्त कारणास्तव काढत असते. प्रत्यक्षात उपरोक्त साहित्य वाटले गेले याची नोंद महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीकडे नाही.लाभार्थ्यांची याचीही नाही. निविदेच्या अटीनुसार ठेकेदाराने साहित्य वाटपाची छायाचित्रं काढायची आहेत. स्टाॅक रजिस्टर मधे नोंद करून लाभार्थ्यांची यादी सादर केल्यानंतर देयके अदा करण्याची स्पष्ट तरतूद आहे. या अटीचे पालन 2010 पासून एकदाही झालेले नाही. गेल्या वर्षी मे.ए.बी.पाटील, कासार आळी,भिवंडी येथील ठेकेदार 24 लाख 84,890 रकमेच्या साहित्याच्या पुरवठ्याचे देयक घेऊन तो मोकळा झाला आहे. पण यातील एकही अट त्याने पाळलेली नाही. यापूर्वी च्या वर्षीही असाच प्रकार झालेला आहे.

याबाबत मी आवाज उठवताच महिला व बालकल्याण समिती व अंगणवाडी प्रकल्पात एकच खळबळ माजली.2010 पासूनचे रेकाॅर्ड शोधण्याची मोहीम सुरू झाली. अंगणवाडीतील अजाण बालकांच्या साहित्य पुरवठ्यात अविश्वसनीय व संतापजनक प्रकार उघडकीस आणण्याचा मी चंग बांधला. गेले काही दिवस मी अंगणवाडीचे साहित्य पुरवठा करणा-या एजन्सी,पुरवठादार व निर्मात्यांचा शोध घेऊन उपरोक्त साहित्याच्या बाजारभावाच्या किंमती मिळविल्या. त्यात सर्व प्रकारचे करही अंतर्भूत आहेत.
वास्तविक 10 लाखावरील खरेदीचे अधिकार अंगणवाडी प्रकल्प अधिकारी वा महिला व बालकल्याण समिती सभापतीसही नाही.त्यासाठी वरिष्ठांची संमती व मान्यता आवश्यक असते.तसेच 10 लाखांवरील व्यवहाराचे थर्ड पार्टी ऑडिट होणे अत्यावश्यक असते. असे असताना एकदाही तसे झालेले नाही.

या वर्षी मी घेतलेल्या हरकतीनंतर आयुक्तांनी यावर्षीची अंगणवाडीसाठी काढण्यात आलेली निविदा रद्द केली.मात्र मी गेल्या पाच वर्षात महिला व बालकल्याण समितीने काढलेल्या निविदांची माहिती माहितीच्या अधिकारावर रितसर मिळवली.त्यानुसार 2018 च्या निविदेतील पुरवलेल्या साहित्याचा दावा केलेल्या शालेय साहित्याचा बाजारभाव व प्रत्यक्षातील किंमती याचा तौलोनिक अभ्यास केला असता- प्रत्यक्षात 9 लाख 40 हजारास बाजार भावाने मिळणा-या साहित्याचे 24 लाख 41 हजार ठेकेदारामार्फत आकारण्यात आले.याचाच अर्थ एकाच वर्षी 15 लाखांचा गंडा महापालिकेसही घालण्यात आला.यात ठेकेदार, महिला व बाल कल्याण समिती, अंगणवाडी प्रकल्प अधिकारी, मुख्य लेखापाल आदी दोषी असल्याचा माझा उघड दावा आहे. अशाच प्रकारे गेली अनेक वर्षे हा भ्रष्टाचार सुरू आहे. प्रत्येक वर्षी अशी तुलना केली तर अंगणवाडीच्या नांवाखाली कोट्यावधीचा भ्रष्टाचार उघडकीस येईल. याची तक्रार मी CAG कडे करणारच आहे.

मी तयार केलेला तक्ता इतका बोलका आहे, की आयुक्तांनी यावर कारवाई केली नाही तरच नवल वाटेल.

दिलीप मालवणकर ९८२२९०२४७०

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!