June 29, 2025 3:20 am

महाघोटाळेबाज महानगरपालिका

अपनी भाषा में पढ़े! Translate

महाघोटाळेबाज महानगरपालिका
लेख मालिका लेख क्रमांक १२

या मॅडमना वाचविण्याचे लांच्छनास्पद प्रयत्न !

आयुक्तसाहेब बदनामीचा कलंक लावुन सेवानिवृत्त व्हायचे असेल तर…

 

मॅडम कोण हे आत्ता गुपित रहिलेले नाही. हो, तिच मॅडम दबंग, डॅशिंग वगरे वगैरे! “हत्ती चले बाजार कुत्ते भोकते हजार” फेम प्रियंका भरत राजपुत !

मालमत्ता कर विभागाचे उपायुक्त पद मंत्रालयातूनच सोबत घेऊन आलेल्या या मॉडर्न मॅडम स्वत:ला दबंग, डॅशिंग म्हणवण्यात व फायरब्रॅन्ड म्हणवुन घेण्यात आनंद मानतात. त्यांची दबंगगिरी व डॅशिंगपणा मातीमोल झाला तरी त्यांचा पिळ काही जळत नाही. भदाणेची चुलत बहिण वाटावी अशीच तिची वृत्ती व प्रवृत्ती आहे. मंत्रालयातील काही कक्ष अधिकारी व राजकिय नेते मॅनेज होत असल्याने या मॅडमचे निलंबन होऊ शकले नाही. त्यातच विद्यमान आयुक्त तिची “आजीजी करीत असावेत असे वागतात.” तिच्या नादी लागु नये, त्यांनी जरी मिटींग अटेंड केली नाही, मनमानीपणे वागल्या तरी तिच्या नादी न लागण्याचे” आयुक्तांनी फर्मानले आहे. हा भित्रेपणा म्हणावा की दबावाची मजबुरी हे त्यांनाच ठाऊक ! परंतू आयुक्त प्रियंका राजपुत बाबत जास्तच औदार्य दाखवत आहेत व त्यांना अप्रत्यक्षरित्या संरक्षणच देत आहेत, अशी साधार शक्यता वाटते.

या मॅडमची निवडणुक विभाग प्रमुख पदी नियुक्ती केलेली असताना त्यांनी दीड कोटीच्या कामांची शासकिय नियम डावलून जी खैरात केली व बोगस कामांची बिलं अदा केली, याबाबत मी तक्रार केली असता महालेखाकार मुंबई यांनी दोषी असल्याचे सिद्ध केले. तत्पुर्वी महापालिकेच्या लेखा शाखेने २८ लाखांच्या चार देयकांची चिरफाड करून अब्रू चव्हाट्यावर आणली. हा अहवाल सप्टेंबर २०२२ मध्ये आयुक्तांकडे सादर करूनही आयुक्त मौनीबाबा बनून कारवाई बाबत नकारघंटा वाजवत बसले आहेत.

जवळपास १० महिने लोटले तरी आयुक्त साहेब प्रियंका राजपुत यांच्याबाबत कारवाई करू शकले नाहीत. या उलट पुण्यातील हवेली तालूक्याच्या तहसिलदार तृप्ति कोलते यांच्याविरोधात गेल्यावर्षीच अशाच प्रकरणात निलंबनाची कारवाई झाली होती. मात्र प्रियंका राजपुत यांच्यासाठी आयुक्तांनी सदर कायदा बासनात गुंडाळून ठेवला आहे. यावरून कुठे तरी पाणी मुरत आहे हे निश्चित. आयुक्त कोणाच्या आशीर्वादाने उल्हासनगरचे आयुक्त झाले व त्यांच्यावर कोणाचे नियंत्रण आहे, हे काही लपुन राहिलेले नाही. तसे असले तरी तोंडी हुकूम सोडणारे तुमचे न्यायपालिकेत संरक्षण करू शकणार नाहीत ! हे जर निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या आयुक्तांना लक्षात येत नसेल तर त्यांना त्यांच्या कर्माची फळं भोगावी लागतील, हे वेगळं सांगायची गरज नाही.

वालधुनी नदी किनारी सरकारी भुखंडावर जे अनधिकृत बांधकाम झाले त्या जागेवर मालमत्ता कर पावती देण्याच्या गुन्ह्यात मालमत्ता कर उपायुक्त या नात्याने प्रियंका राजपुत याच जबाबदार असताना त्यांना वाचवण्याचा लांच्छनास्पद प्रयत्न केला जात आहे.

या नंतर सदर पुरावा नष्ट करण्याच्या उद्धेशाने सदर पावतीची नोंद वेबसाईट वरून बेकायदेशीरपणे हटवून पुरावा नष्ट करण्यासाठी देखील मालमत्ता कर विभाग प्रमुख या नात्याने प्रियंका राजपुत याच जबाबदार ठरतात. तरी देखील आयुक्त हतबलतेने त्यांची पाठराखण करण्यात धन्यता मानत असतील तर अल्ला वा खुद त्यांना माफ करणार नाही. एका दोषी महिलाअधिका-यास संरक्षण देऊन आयुक्त निवृत्तीपुर्वीच आपले भवितव्य धोक्यात आणत आहेत.

विधी मंडळातील LAQ ला “चौकशी सुरू आहे” असे गोलमाल उत्तर देऊन आयुक्त विधी मंळाचीही दिशाभूल करीत आहेत. ज्या अधिकारी महिलेस दोन स्वतंत्र शासकिय यंत्रणांनी दोषी ठरवले आहे, त्या महिलेस निलंबित न करता चौकशी सुरू आहे, असे फसवे उत्तर देऊन आयुक्त स्वत:लाच अडचणीच्या चक्रव्युहात अडकवु पाहत आहेत.

आयुक्त साहेब

तुम तो ठहरे परदेशी कल सुबह की गाडीसे निकल जाओगे !

परंतू माझे तसे नाही, मी या शहराचा भुमीपुत्र आहे. हे शहर माझी जन्मभूमी तर आहेच परंतू ती कर्मभूमीही आहे. त्या कर्मभूमीचे तुमच्या सारख्या मिंधेगिरी करणा-या हतबल आयुक्तांपासून तसेच भ्रष्ट लोकप्रतिनिधी, ठेकेदार व अधिका-यांपासून रक्षण करणे माझे कर्तव्य आहे. मी सरकारी नोकरीतून सेवा निवृत्त होऊन ९ वर्षे पेन्शन घेतली असती परंतू मी वयाच्या ३१ व्या वर्षी सरकारी नोकरी झुगारून समाजसेवा व पत्रकारितेस वाहून घेतलं. याला तुमच्यासारखे लोक वेडेपणा म्हणतात परंतू वेडी माणसंच इतिहास घडवतात हे विसरू नका!

अजूनही संधी आहे सुधर जाओ और संभल जाओ !

वेडी माणसं ना, त्या पतंगा सारखी असतात, परिणामांची पर्वा न करता दिव्यावर झेपावतात, बाजीप्रभू देशपांडे व त्यांच्या मावळ्यांना ठाऊक होते की आपण जीवंत राहणार नाही शत्रूच्या हातून आपला खुर्दा होईल खात्मा होईल ! परंतू ते स्वराज्य व स्वामी रक्षणासाठी प्राणपणाने लढले, नडले व धारातीर्थी पडले परंतू त्यांनी स्वराज्याचे व स्वामींचे रक्षण केले, असाच मी वेडात दौडले वीर मराठे सात पैकी एक मावळा माझ्या शहराच्या हितासाठी लढत आहे.

मी ही एक दिवस त्या मावळ्यांसारखा धारातीर्थी पडणारआहे. परंतू माझी नोंद मर्द मावळा म्हणून होईल तुमच्यासारख्यांची नोंद शहर बरबाद करणा-यांत होईल.

खुदाहाफिज

शब्बाखैर

दिलीप मालवणकर ९८२२९०२४७०

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!