शेटफळ गडे येथिल ग्रामस्थांनी शुरविरांना केले वंदन
प्रतिनिधी:- प्रा तुषार वाबळे
देशाबद्दल असणारी निस्सीम भक्ती आणि अभिमान प्रत्येकाला स्मरण करून देते ती या देशासाठी बलिदान देणाऱ्या शुरविरांची.आज 24 वा कारगिल विजय दिन याचे औचित्य साधुन शेटफळगडे गावातील समस्त ग्रामस्थांनी स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक बांधव यांचा शाल,श्रीफळ देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी सत्कारमूर्ती माजी सैनिक श्री महादेव रामचंद्र झगडे, मोहन सिताराम वाबळे, बाळासो नामदेव भोसले ,सर्जेराव बाबुराव झगडे ,विलास चांगदेव शेलार, लहू रघुनाथ वाबळे, पांडुरंग भिकोबा वाबळे ,जालिंदर सखाराम गिरीगोसावी, जितेंद्र शंकर माळवे रामदास सुरेश पारंबे , रमेश दिगंबर पारंबे ,ज्ञानदेव पवार ,पद्माकर भानुदास शेलार, बबन सवाने हे उपस्थीत होते.यावेळी गावचे प्रथम नागरिक श्री राहुल जनार्दन वाबळे सरपंच तसेच गावचे ग्रामविकास अधिकारी गरजे भाऊसाहेब, तलाठी भाऊसाहेब श्रीमंत फुलचंद दराडे , गावचे माजी सरपंच श्री बापूसाहेब वाबळे ,श्री अण्णा शिरसाट ,माऊली भोसले ,सागर वाबळे , पिंटू धुमाळ ,सोमनाथ सवाने, ज्ञानेश्वर वाबळे ,मानसिंग वाबळे ,मारुती शिरसाट ,अंबादास भोसले ,शंकर राऊत ,सूर्यकांत वाबळे विजय वाबळे, हनुमंतराव वाबळे, वसंत ज्ञानदेव राजपुरे , अशोकनाना जगताप संतोषकाका वाबळे अशोक वाबळे पत्रकार संतोष सवाने या वेळी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरूवात करुन भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सर्वांनी शहीद झालेल्या जवानांना आदरंजली वाहून माजी सैनिकांनी आपले मनोगत व्यक्त केले शेवटी वंदेमातरम घेऊन “जय जवान,जय किसान”अशा घोषणा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.