June 29, 2025 11:08 pm

तृतीयपंथीयांच्या पुढाकाराने निघालेल्या शिरूर ते अक्कलकोट पालखी चे दौंड मध्ये स्वागत.

अपनी भाषा में पढ़े! Translate

तृतीयपंथीयांच्या पुढाकाराने निघालेल्या शिरूर ते अक्कलकोट पालखी चे दौंड मध्ये स्वागत.
प्रतिनिधी – विकी ओहोळ
8446119158

दौंड – काल शिरूर ते अक्कलकोट पायी पालखीचे स्वागत श्री दत्त पिठ दत्त मंदिर सिद्धटेक रोड दौंड येथील मंदिरावर करण्यात आले तृतीपंथीयाच्या पुढाकारणे हा पालखी सोहळा काढण्यात आला होता तृतीयपंथासहित काही सर्वसाधारण व्यक्ती या पालखीत सहभागी झाले होते दौंड येथील सिद्धटेक रोड वरील निसर्गरम्य वातावरणात श्री दत्त पिठ दत्त मंदिरावर पालखी विसाव्यासाठी थांबले होते यावेळी श्री स्वामी समर्थ पालखीचे पूजन सामाजिक कार्यकर्ते निलेश सावंत यांनी केले.
शिरूर ते अक्कलकोट पायी वारीचे गेल्या अनेक वर्षापासून मनात होते परंतु स्वामीच्या आशीर्वादामुळे पायी पालखी सोहळ्याच योग घडून आला आम्हाला संसाराची आशा नाही तेव्हा स्वामीची भक्ती करत भविष्यात शिरूर ते अक्कलकोट पायी वारी केली जाईल श्री दत्त पिठ दत्त मंदिरावर निसर्ग रम्य वातावरणात आमची मंदिराच्या वतीने राहण्याची छान सोय करण्यात आली असे पालखी प्रमुख संचिता पाटील जितेंद्र पाटील यांनी सांगितले.
पालखी रथातील श्री स्वामी आकर्षक मुर्ती पालखी रथाला लावलेले ध्वज आणि स्वामी समर्थांच्या नमजापाची स्वर यामुळे पालखी रथाचे वेगळेपण या रथातील मुख्य आकर्षण आहे.
श्री दत्त पिठ दत्त मंदिरावर पालखी सोहळातील सर्व स्वामी भक्तांचे स्वागत करण्यात आले व यावेळी पालखीतील स्वामी भक्तांना फराळाची वाटप करण्यात आले त्यानंतर पालखी मजल दर मजल करत रावणगाव येथे मुक्कामी गेली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!