नवयुग शिक्षण संस्थेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा.
प्रतिनिधी – विकी ओहोळ
8446119158
दौंड – स्व. लाजवंती भावनदास गॕरेला माध्य. व उच्च माध्य. विद्यालय, भिमनगर दौंड. या विद्यालयाच्या प्रांगणामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस विविध उपक्रमांच्या माध्यमातून पार पडला. नवयुग शिक्षण संस्था,दौंड व दौंड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने २२जुलै २०२३ रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . कार्यक्रमाच्या सुरुवातीस रायगड जिल्ह्यातील ईर्सालवाडी या ठिकाणी दरड कोसळून मृत पावलेल्या लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
विविध उपक्रमांमध्ये सर्वप्रथम नवयुग शिक्षण संस्थेच्या वतीने इयत्ता पहिली ते आठवी या वर्गांमधील १००० विद्यार्थ्यांना शालेय गणवेश मोफत वाटण्यात आला.
नंतर दौंड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने ७०० गरीब वा गरजू महिलांना मोफत साड्यांचे वाटप करण्यात आले.
कणि महिला मंच, दौंड यांच्यावतीने विद्यालयातील गरीब व गरजू विद्यार्थीनींना मोफत स्कूल बॅग चे वाटप करण्यात आले ,गुरुनानक सेवा संघ, दौंड यांच्या वतीने वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले.
दौंड साखर कारखाण्याच्या वतीने संस्थेतील विद्यार्थ्यांना सॕनिटायझरचे वाटप करण्यात आले. या नंतर नवयुग शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी संस्थेने घेतलेल्या चोविस आसनी स्कूल बस चे विधीवत पूजन करुन उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेशआप्पा थोरात हे होते. या कार्यक्रम प्रसंगी विरधवल जगदाळे पाटील ( संचालक दौंड शुगर), सौ. वैशालीताई नागवडे ( पंचायत समिती सदस्या,दौंड), मा. सौ. वैशालीताई धगाटे, अब्जलभाई पानसरे, विलासबापू शितोळे, विनायक माने, आबा वाघमारे, वसिम शेख, प्रशांत धनवे, सौ. संध्या डावखर, सौ.मनिषा जठार, आकाश पलंगे,आनंद बगाडे, सुर्यकांत गायकवाड ( अध्यक्ष दिव्यांग सेल), दिपकभाऊ सोनवणे( अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग), आजय राऊत व प्रशांत धनवे आदी मान्यवर उपस्थित होते. नवयुग शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुमुख नारंग यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचा सन्मान करुन मान्यवरांच्या शुभहस्ते शालेय साहित्यांचे वाटप केले. विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब वागसकर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे पर्यवेक्षक विजय वाघ यांनी केले.