बाभूळ गावचा नागेश मिसाळ झाला तालुका कृषी अधिकारी.
प्रतिनिधी भगवान लोंढे
इंदापूर – मौजे बाभूळगाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथील नागेश रामचंद्र ( आप्पा. ) मिसाळ हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा अंतर्गत तालुका कृषी अधिकारी म्हणून इंदापूर तालुक्यातून अनुसूचित जाती प्रवर्गातून निवड झाली आहे पहिल्या प्रयत्नात त्याने यश संपादन केले आहे त्यामुळे त्याचे इंदापूर तालुक्यातून कौतुक होत आहे तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री मा. श्री हर्षवर्धन पाटील यांनी त्याचे अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.