पदाचा गैरवापर करून खोटे कागदपत्र तयार केल्या कारणाने एलसीबी ने केला भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल…
सहभागी प्रकरणात तहसिलदारसह, तलाठी मंडलधिकारी, अप्पर जिल्हाधिकारीसह अधिकाऱ्यांची लागली रांग……
अहमदनगर जिल्हयात आसे अनेक प्रकरण आसण्याची शक्यता
अहमदनगर:पदाचा गैरवापर करून खोटे कागदपत्र तयार केल्या कारणाने एलसीबी कडे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.सहभागी प्रकरणात तहसिलदारसह, तलाठी मंडलधिकारी, अप्पर जिल्हाधिकारीसह अधिकाऱ्यांची लागली रांग……
अहमदनगर जिल्हयात आसे अनेक प्रकरण आसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सदर प्रकरण सविस्तर आसे की आरोपीचे नांव व कार्यालय.
१) एल. एन. पाटिल, तत्कालीन तहसिलदार अहमदनगर
२) एल.एस. रोहकले, तत्कालीन तलाठी सजा वडगांवगुप्ता, ता. जि. अहमदनगर
३) दुर्गे, तत्कालीन मंडळ अधिकारी, नालेगाव, ता. जि. अहमदनगर
४) व्ही. टी. जरे. तत्कालीन अपर जिल्हाधिकारी अहमदनगर ५)राजेंद्र मुठे, तत्कालीन उपविभागीय अधिकारी नगर भाग
(६) दिलीप बबन निराली, तत्कालीन सह दुय्यम निबंधक, अहमदनगर-२ व इतर ३२ आरोपी (खाजगी इसम.
प्रस्तुत बातमीतील हकीगत अशी की, दि.३/१/२००६ रोजीचे पूर्वी ते दि.६ / १ २००६ रोजी मौजे वडगाव गुप्ता शिवारातील गट नं.२०३ क्षेत्र २ हेक्टर ९७ आर पोट खराबा ०.०९ आर. गड न. २०५ एकुण क्षेत्र १ हेक्टर ३७ आर हो कनिष्ट महार वतन हाडोळा इनाम वर्ग ६ब चौ जमिन जुन्या शर्तीवर करणेसाठी अटी व शर्तीवर तत्कालीन तहसिलदार अहमदनगर यांनी बेकायदेशीर परवानगी दिली आहे. यातील १) लोकसेवक तहसिलदार एल.एन पाहिल यानी काढलेल्या आदेशास २) लोकसेवक एल.एस. रोहकले, तत्कालीन तलाठी सजा वडगावगुप्ता लोकसेवक दुर्गे तत्कालीन मंडळ अधिकारी, नालेगांव यांनी मदत केली आहे व खरेदी विक्री व्यवहाराच्या नियमबाहय फेरफार नोंदी घेवुन खाजगी इसम उत्कर्ष पाटिल व अजित लुंकड यांना मदत केली आहे.
तसेच लोकसेवक ४) लोकसेवक तत्कालीन अपर जिल्हाधिकारी अहमदनगर व्ही.टी. जरे व ५)तत्कालीन उपविभागीय अधिकारी नगर भाग राजेंद्र मुठे याना सदरचा आदेश बेकायदेशीर असल्याची माहिती असुन देखील त्यांनी कुठलीही कारवाई न करता, बेकायदेशीर व्यवहारात सहभागी होवुन सदर व्यवहारास एक प्रकारे प्रोत्साहन दिले आहे असे दिसुन येत आहे. ६) लोकसेवक दिलीप बबन निराली, तत्कालीन सह दुय्यम निबंधक, अहमदनगर-२ यांनी खरेदी विक्रीचे बेकायदेशीरपणे दस्त नोंदविले आहे. तसेच नमुद जमिनीचे भोगवटादार ७) दिनकर आनंदा शिंदे, ८) विनायक शंकर शिंदे, ९) बाबु आनंदराव शिंदे. १३) मोहन आनंदराव शिंदे. ११) वामन किसन शिंदे, १२) यादव किसन शिंदे, १३) सदाशिव केशव शिंदे, १४) रामभाऊ केशव शिंदे, १५) सुनिल केशव शिंदे, १६) यादव केशव शिंदे, १७) श्रीमती मालनबाई केशव शिंदे. १८) श्रीमती लता शांतवण भाकरे. १८) अरुण दगडु शिंदे, २०) शालनबाई दगडु शिंदे, २१ ) लक्ष्मण रामचंद्र शिंदे, २२) मथुरा विष्णु शिंदे. २३) संदिप विष्णु शिंदे २४ ) सुनिता रतन गायकवाड, २५)नंदा शाम घाटविसावे, २६) शालुबाई शाहुराव प्रभुणे, २७) मच्छिंद्र आनंदाव शिंदे, २८) लिलाबाई चंद्रभान पाडळे, २९ ) शोभा बुध्दीराम ठाकुर, तसेच संमती देणार ३०) वत्सलाबाई तुकाराम पाचारणे. ३१) सुशिला शांतवण घाटविसावे, ३२) तुळसाबाई मारुती नरवडे, ३३) छबुबाई भिवाजी साळवे, ३४) इंद्रायणी विठठल जाधव, ३५) वत्सला वामन जाघव, ३६) कौसल्या दामु जगताप यांचे जनरल मुखत्यार ३७) उत्कर्ष सुरेश पाटील, रा. श्रमिकनगर आनंदपोजी मार्ग अहमदनगर व जमिन खरेदी करणारे ३८ ) अजित कचरदास लुंकड, रा. आनंद दर्शन अपार्टमेंट, मार्केट यार्ड, अहमदनगर यांना सदरची जमिन हि महार वतन हाडोळा इनाम वर्ग ६ ची जमिन असल्याचे माहित असुन देखील त्यांनी वरिल नमुद तहसिलदार यांना सदर जमिन जुन्या शर्तीवर करणेसाठी अटी व शर्तीवर परवानगी देण्यासाठी मदत करून, खोटे कागदपत्र तयार करून, सदर जमिनीची खरेदी विक्री व्यवहार करुन दस्त नोंदणी करून ७/१२ उताऱ्यावर व फेरफार नोंदी घेतलेल्या आहेत व दस्त तयार करून शासनाची फसवणुक केली आहे.
सदर बाबत एम.आय.डी.सी. पो.स्टे… जि. अहमदनगर येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम १३(१)(ड) सह १३(२) सह भा.दं.वि.क. १६७. ४२०, १०९ प्रमाणे दि. १९/०७/२०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप अधीक्षक श्री प्रविण लोखंडे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहमदनगर हे करीत आहेत.