एस बी पाटील सोबत मुलांच्या उज्वल भवितव्याची वाटचाल:प्राचार्य डॉ.एस टी शिरकांडे

अपनी भाषा में पढ़े! Translate

एस बी पाटील सोबत मुलांच्या उज्वल भवितव्याची वाटचाल:प्राचार्य डॉ.एस टी शिरकांडे

दिनांक:20/07/2023
प्रतिनिधी समाधान रजपूत.

बारावीनंतरच्या शिक्षणानंतर बहुतेक विद्यार्थी आणि पालक सुरक्षा चांगल्या पगाराच्या नोकऱ्या आणि उत्कृष्ट जीवन जगण्याचा शोध घेत असतात. भारतात अनेक नवीन शैक्षणिक कार्यक्रम सुरू झाले आहेत तरी त्यामुळे अभियांत्रिकीची मागणी कायम आहे.इंदापूर येथील शहाजीराव पाटील विकास प्रतिष्टान संचलित एस बी पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये कम्प्युटर , इ अँड टी सी,इलेक्ट्रिकल ,मेकॅनिकल ,सिविल तसेच कम्प्युटर क्षेत्रातील अग्रगण्य अशी आर्टिफिशल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स ही शाखा देखील उपलब्ध आहे. महाविद्या लयातील २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात भरपूर विद्यार्थ्यांची निवड नमकित कंपन्यांमध्ये निवड झालेली असून त्यापैकी महाविद्यालयाच्या संगणक विभागातून मागील शैक्षणिक वर्षात पाठक साक्षी आणि चव्हाण ऋषिकेश या दोघांची निवड टी सी एस या कंपनीमध्ये (प्रती वर्ष ३.३६ लाख), आवटे सुयश आणि मोरे श्र्वेता यांची निवड  हेक्सावेअर् या कंपनीमध्ये (प्रतीवर्ष ४ लाख),किरण अकॅडमी मध्ये चार विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे त्यात मोरे श्र्वेता, नारखेडकर अजय ,हजारी जयदीप , घुगरकर पुजा (प्रती वर्ष ४ लाख),सावंत स्वाती हिची इरिज टेक्नॉलॉजी या  कंपनीमध्ये ( प्रति वर्ष ४.९ लाख) या आयटी कंपन्यांमध्ये निवड झालेली आहे. तसेच एक्सेलआर कंपनी मध्ये सात विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे त्यात सावंत स्वाती,जाधव सौरभ,दुधाळ विजय,कुलकर्णी आदिती,पवार अश्विनी ,राऊत ओंकार , पाठक साक्षी(प्रतीवर्ष ३ लाख ) अशी निवड झालेली आहे तसेच सहा विद्यार्थ्यांची पेंटॉगोन् स्पेस या कंपनीमध्ये नारखेडकर अजय,जमदाडे प्रगती, गणगे शुभांगी,लोखंडे अमृता,शिंदे भारती, चव्हाण भाग्यश्री (प्रतीवर्ष ३ लाख ) अशी या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. शिंदे विशाल हा विद्यार्थी क्वालिटी किओस्के ३ लाख प्रती वर्ष  तसेच क्यू स्पायडर या कंपनीमध्ये  खालील आठ विद्यार्थ्यांची निवड झाली असून  ते सध्या ट्रेनिंग घेत आहेत त्यामध्ये   राऊत ओंकार ,येवले प्रदिप,भोसले ऋतुजा, कणसे कुणाल,सरगर ऋतिक,भोसले धनश्री,जगताप सोनाली अशी क्यू स्पायडर मध्ये निवड  झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत (प्रतीवर्ष ३ लाख )या कंपनीमध्ये निवड झाली आहे.
महाविद्यालयाच्या  इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातील (२०२२-२०२३) शेवटच्या वर्षाला शिकणाऱ्या  विद्यार्थ्यांची टेकलोगोस ऑटोमेशन प्रायवेट लिमिटेड,मिंडा इन्फाक प्रायवेट लिमिटेड, संसुई  इलेक्ट्रॉनिक्स प्रायवेट लिमिटेड, एव्हर इलेक्ट्रॉनिक्स ,पेन्टॅगॉन  स्पेस प्रायवेट  लिमिटेड,कीस्टोन सिस्टिम प्रायवेट लिमिटेड,जिंदाल स्वा लिमिटेड ,सेडिमॅक इलेक्ट्रॉनिक्स प्रायवेट लिमिटेड, एक्सएलआर , क्यू स्पायडर यासारख्या  वेगवेगळ्या नामांकित आय टी  व  कोअर इलेक्ट्रॉनिक्स  कंपन्यांमध्ये  थेट मुलाखतीद्वारे  निवड झालेली आहे. त्यामध्ये अमर कांबळे (प्रतीवर्ष ६ लाख ) जिंदाल स्वा लिमिटेड कंपनीमध्ये, समाधान बाबर (प्रतीवर्ष ३. ७५ लाख ) मिंडा इन्फाक प्रायवेट लिमिटेड मध्ये, प्रणव पाटील (प्रतीवर्ष ३ लाख ) एक्सएलआर मध्ये, शरण्या राव व वैभव कवडे (प्रतीवर्ष ३ लाख ) किरण अकॅडेमि मध्ये, प्रथमेश लोखंडे (प्रतीवर्ष ३ लाख ), पेन्टॅगॉन स्पेस प्रायवेट लिमिटेड कंपनी मध्ये, साक्षी सावंत, नेहा शिंदे, सुरज मगर, ऐश्वर्या बंडगर,ज्ञानेश्वरी गीते, दिग्विजय घोडके, गौरी झगडे, कवडे हर्षदा, वैष्णवी सामोसे, रोहिणी लाटे, सरिता सूर्यंवंशी, ओंकार सोंडकर, विशाल परदेशी यांचे टेकलोगोस ऑटोमेशन प्रायवेट लिमिटेड  मध्ये, शरण्या राव, साक्षी सावंत, नेहा शिंदे, वैभव कवडे या विद्यार्थ्यांची संसुई इलेक्ट्रॉनिक्स प्रायवेट लिमिटेड मध्ये  तसेच संजय पवार  कीस्टोन सिस्टिम प्रायवेट लिमिटेड मध्ये या बरोबरच  कोअर इलेक्ट्रॉनिक्स कंपनी एव्हर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये  ज्योती भोसले ,आरती कचरे प्रथमेश लोखंडे ,दिग्विजय घोडके, विशाल परदेशी या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. त्याच बरोबर या विभागातील काही विद्यार्थी महाविद्यालयाच्या ‘इंटर्प्रिनरशिप डेव्हलपमेंट सेल’ च्या मदतीने उद्योजक म्हणून नावारूपास आलेले आहेत.
स्थापत्य अभियांत्रिकी विभागातून पुणे येथील इलीएशन, टी अँड टी, इन्व्हेंटिस प्रोजेक्ट्स प्रायवेट लि, फोर कलर अरुणोदीप इन्फ्रा, आय डी एस एस ग्लोबल, बालसन इन्फ्रा, सह्याद्री या नामांकित कंपनीमध्ये थेट मुलाखतीद्वारे निवड झालेली आहे.त्यामध्ये समीर गायकवाड,इम्रान पठाण ,अभिषेक रनवरे  (प्रतीवर्ष ४. २लाख ) इलीएशन कंपनीमध्ये विश्वजीत शेखर, अभय काळे, विकास सूर्यवंशी, संकेत लोंढे (प्रतीवर्ष ३. ६ लाख) इन्व्हेंटिस प्रोजेक्ट्स प्रायवेट लि कंपनीमध्ये समाधान सावंत (प्रतीवर्ष ३ लाख) फोर कलर इंडिया प्रायवेट लि कंपनीमध्ये ओंकार देवकर (प्रतीवर्ष २.४ लाख) टी अँड टी कंपनीमध्ये अजिंक्य शिंदे (प्रतीवर्ष २.४ लाख) अरुणोदीप कंपनीमध्ये निखिल जाधव,संकेत कदम  (प्रतीवर्ष २.४ लाख) आय डी एस एस कंपनीमध्ये सत्यजीत घमे (प्रतीवर्ष २.४ लाख) बालसन इन्फ्रा कंपनीमध्ये तसेच गणेश चांदणे (प्रतीवर्ष २.४  लाख) सह्याद्री या विविध विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे.
महाविद्यालयाच्या इलेक्ट्रिकल विभागाच्या चालू शैक्षणिक वर्षाच्या विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मध्ये 15 विद्यार्थ्यांची निवड. घुले गौरव, रेगुडे सोमनाथ ,सपकळ ओमकार , मगर ऋषिकेश, कारंडे विनायक, चोरमले करण ,माने सुरज, बनसोडे प्रसाद ,लाडे सौरभ ,डोळसे नागेश, गोपन मयुरी ,कदम गौरी यामध्ये टेक लोगोस ,एव्हर इलेक्ट्रॉनिक्स, मॅककॅलटे इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मध्ये , बीईपी मशिनरी कंपनी (प्रतीवर्ष ३ लाख), महिंद्रा सस्टेन प्रा.लि., इन्फोसिस(प्रतीवर्ष ३.५ लाख), क्यू स्पायडर(प्रतीवर्ष ३ लाख), तोशिबा(प्रतीवर्ष ३ लाख),पेंटॅगॉन स्पेस प्रायव्हेट लिमिटेड , एक्झिकॉम टेली-सिस्टम , ए. क्यू इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल कॉम्पोनन्ट्स असा विद्यार्थ्यांचा समावेश आहे. कुशल विद्युत अभियंत्यांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे . विद्युत वाहन उद्योग (इलेक्ट्रिक व्हेहिकल्स ) त्यात अग्रेसर आहे .यामध्ये इलेक्ट्रिक मोटर डिझाइन , बॅटरी मानजमेंट सिस्टिम ,बॅटरी चार्जेर इ यामध्ये विद्युत अभियंत्यांना मागणी आहे .तसेच बॅटरी चार्जेर स्टेशन उभारणी व संचालन यामध्ये व्यवसायाची सुवर्णसंधी आहे.भविष्यकाळातील चार्जिंग स्टेशन ची वाढती मागणी लक्षात घेऊन सरकारने विविध योजना या क्षेत्रातील उद्योगजकांसाठी जाहीर केल्या आहेत . गुणवान विद्यार्थी या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये इंटर्नशिप व प्रोजेक्ट करून यातील कौशल्य प्राप्त करतात.
महाविद्यालयातील मेकॅनिकल विभागातून ओंकार हिरवे याची युनायटेड टायरक्राफ्ट्स प्रतिवर्ष ३लाख,आकाश विटकर याची चेग इंडिया मध्ये प्रतिवर्ष ४.५लाख,दर्शन माळी याची रॉक कट मध्ये प्रतिवर्ष ४.२लाख तसेच बोराटे रवी, बोराटे वैभव, बरळ अभिजित, माने सचिन, शिद अक्षय, घाडगे अभिषेक यांची कल्याणी फोर्ज मध्ये प्रतिवर्ष २.४ लाख,गणेश पोटरे, गंगाधर कांबळे, चैतन्य थिटे, रोहित निंबाळकर यांची झेड एफ स्टीयरिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मध्ये प्रतिवर्ष २.५२लाख,खंडागळे सचिन, लाटे हर्षवर्धन, मखरे स्वप्नील, कदम महेश यांची बॉश चेसिस इंडिया मध्ये प्रतिवर्ष २.४ लाख
साठी निवड झालेली आहे.
महाविद्यालयातील शैक्षणिक गुणवत्ता गुणवत्तेसाठी उपलब्ध असलेली साधनसामग्री, शिक्षण पद्धती, ग्रंथालय, महाविद्यालयात राबवले जाणारे विविध उपक्रम, एन एस एस, परीक्षा विभाग, क्रीडा विभाग, स्पर्धा परीक्षा रोजगार मार्गदर्शन, सांस्कृतिक विभाग, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट, अँटी रॅगिंग, होस्टेल, मेस अशा अनेक गोष्टींचे मूल्यांकन करून मागील वर्षी नॅक समितीने महाविद्यालयाला ‘अ’ श्रेणी देऊन महाविद्यालयाला नामांकित केले.
महाविद्यालयामध्ये अभ्यासाबरोबरच मुलांना क्रीडा विभागातर्फे बेसबॉल, सॉफ्टबॉल, कबड्डी, खो-खो, चेस, क्रिकेट, अथलेक्टिक आशा विविध खेळांचे प्रशिक्षण दिले जाते. यामुळे गेल्या शैक्षणिक वर्षांमध्ये विविध विभागातील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रांमध्ये चांगली बाजी मारली आहे. फक्त शैक्षणिकच नाही तर विद्यार्थ्यांना नृत्य, गायन, वादन, नाट्य याचाही विकास व्हावा या दृष्टिकोनातून महाविद्यालयामध्ये दरवर्षी कलाविष्कार या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. महाविद्यालयातील सर्व लॅब्स या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मार्गदर्शक तत्वानुसार अद्ययावत उपकरणांनी सुसज्ज आहेत. तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक वृंदहि उच्च शिक्षित आहेत. विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल नॉलेज मिळण्यासाठी वेळोवेळी इंडस्ट्रियल व्हिझीट,इंटर्नशिप प्रोग्रॅम,वेगवेळ्या विषयांची कार्यशाळा तसेच प्रशिक्षित तत्ज्ञां कडून मार्गदर्शन केले जाते. याचा विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मध्ये फायदा होत आहे. २००९ साली स्थापन झालेल्या एस बी पाटील अभियांत्रिकीमधून प्लेसमेंट च्या माध्यमातून आजपर्यंत हजारो विध्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे. तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयाचा नामांकित कंपन्यांशी सामंजस्य करार असल्याने गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच विविध विषयांचे ट्रेनिंग तसेच प्लेसमेंट मध्ये ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी प्रा.एस. पी.कांबळे यांच्या योगदानामुळे महाविद्यालय आघाडीवर आहे.
आपल्या महाविद्यालयातून दरवर्षी अनेक विद्यार्थ्यांची नामांकित आयटी कंपन्यांमध्ये तसेच इतर नामांकित कंपन्यांमध्ये कॅम्पस मुलाखती मधून निवड होते त्यासाठी या संस्थेचे अध्यक्ष व माजी मंत्री श्री. हर्षवर्धन पाटील,सचिव सौ.भाग्यश्री पाटील , उपाध्यक्षा सौ. अंकिता पाटील- ठाकरे,विश्वस्त राजवर्धन पाटील यांचे नेहमीच मार्गदर्शन लाभते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!