June 30, 2025 2:57 pm

एसटी आली धावून रेल्वे च्या मदतीला…

अपनी भाषा में पढ़े! Translate

एसटी आली धावून रेल्वे च्या मदतीला…

रेल्वे स्थानकांपासून निवासी भागापर्यंत प्रवाशांना मोफत सेवा देण्याचे नियोजन…- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

प्रतिनिधी-अर्जुन आहेर

दिवसभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रेल्वेची वाहतूक काही ठिकाणी खंडित झाली होती, तर काही ठिकाणी संथपणे सुरू होती. अशावेळी कार्यालयातून अथवा आपल्या कामधंद्यावरून घरी निघालेल्या मुंबईच्या चाकरमान्यांना लवकरात लवकर सुरक्षित घरी पोहोचता यावे, त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मी एसटी महामंडळाचे अध्यक्षांना एसटीला मुख्य रेल्वे स्थानकांजवळ आपल्या बसेस तैनात करण्याबाबत सुचना दिल्या. तसेच त्या बसेस द्वारे रेल्वे स्थानकात अडकलेल्या प्रवाशांची मोफत सोय करण्याचे निर्देशही दिले. त्यानुसार एसटीच्या मुंबई आणि ठाणे विभागाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, कुर्ला, ठाणे, कल्याण इत्यादी महत्त्वाच्या रेल्वेस्थानकांवर आपल्या १०० पेक्षा जास्त बसेस लावून तेथून रेल्वे प्रवाशांना त्यांच्या निवासी क्षेत्रापर्यंत मोफत वाहतूक करण्याचे नियोजन केले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!