फुटजवळगावच्या सरपंचाच्या विरोधात अमर पवार यांची अतिक्रमणची तक्रार..
अजिनाथ कनिचे
दि. २०- : माढा तालुक्यातील फुटजवळगाव येथील सरपंच यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केले असल्याची तक्रार सोलापूर जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल करण्यात आली आहे.
याबाबत सोलापूर येथे जिल्हाधिकारी यांच्याकडे अमर दत्तात्रय पवार यांनी वकिलामार्फत दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,फुटजवळगावच्या सरपंच शोभा बापू पवार यांनी सीना माढा योजनेच्या पाईप लाईनच्या वर शासकीय जागेवर अतिक्रमण केले आहे.यामुळे त्यांना फुटजवळगाव ग्रामपंचायत
सदस्य व सरपंच पदावरून अपात्र करण्यात यावे.
तक्रारदाराच्या वतीने ॲड आशिष वानखेडे हे काम पाहत आहेत.