कोमल शिंदे हिची PSI पदी अभिनंदनीय निवड : समाजास आपला सार्थ अभिमान आहे.
जळगाव- आपल्या समाजातील जळगाव जिल्ह्यातील आव्हाणे येथील रहिवासी प्रल्हाद नथू शिंदे यांची नात तथा श्री सोपान व सौ भारती शिंदे यांची कन्या कु. कोमल सोपान शिंदे हिची PSI (पोलीस उपनिरीक्षक) पदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य परीट ( धोबी ) सेवा मंडळ जळगाव जिल्हा व संत गाडगे महाराज परीट धोबी सेवा संस्था भुसावळ मंडळातर्फे सत्कार करण्यात आला व भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या याप्रसंगी महाराष्ट्र राज्य परीट धोबी सेवा मंडळाचे जिल्हा अध्यक्ष श्री कैलास शेलोडे श्री नरेंद्र वाघ ( तालुका अध्यक्ष भुसावळ ) श्री गोपाळ बाविस्कर ( जिल्हा सचिव) श्री क्ष्मण शेलोळे (जिल्हा संघटक श्री रवींद्र वाघळे ( जिल्हाउपाअध्यक्ष ),निलेश महाले, गौरव तिळवणे , श्री सोपान शिंदे सौ भारती शिंदे यांची उपस्थिती होती.