उमरेड पोलिस स्टेशन मध्ये पोलिस सहाय्यक पदी रुजु झालेल्या मांडवले यांचा शिवसेना महिला शिंदे गटाच्या वतिने सत्कार
उमरेड प्रतिनिधी :- अखिल रोडे
उमरेड पोलित स्टेशन मध्ये नुकत्याच रुजु झालेला महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक मांडवले याचा आज दि. ७ जुलै उमरेड विधानसभा क्षेत्रातील शिवसेना महिला शिंदे गटाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी उमरेड विधानसभा महिला प्रमुख संगिता किरपाने यांच्या पुढाकारात सहाय्यक पोलिस निरीक्षक मांडवले यांची नियुक्ती उमरेड पोलिस स्टेशन मधे झाल्याबदल त्यांना पुढपगुच्छ देवुन सत्कार करण्यात आला. यावेळी भिवापूर महिला शिवसेना शहर प्रमुख रिना बांडे बुचे, भिवापूर उपशहर प्रमुख शालु मेश्राम, उमरेड शिवसेना महिला शहर प्रमुख ज्योती उपरकर, उपशहर महिला प्रमुख वैशाली कोसे, किरपाने मॅडम रेखा सेलोकर, सुनिता मेश्राम, कुंदा राऊत, योगिता गायकवाड, प्रति कावळे, शिल्पा चाफले, विशाखा मेश्राम, मनिषा उइके या पदाधिकारी व कार्यकार्या उपस्थित होत्या.