June 29, 2025 9:32 pm

दौंड गोपाळवाडी येथिल रक्तदान शिबिराला तरुणांचा उस्फुर्त सहभाग.

अपनी भाषा में पढ़े! Translate

दौंड गोपाळवाडी येथिल रक्तदान शिबिराला तरुणांचा उस्फुर्त सहभाग.
183 पिशवी रक्त संकलन करण्यात आले.
प्रतिनिधी – विकी ओहोळ
8446119158
दौंड- गोपाळवाडी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, आयोजक विठ्ठल होले यांनी सांगितले 183 रक्त दात्यानी या शिबिरात रक्तदान केले आहे, गोपाळवाडी येथे सदर रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते, शनिवार दिनांक 8/7/23 रोजी सकाळी 10 वाजता दौंड उपविभागीय पोलीस अधीक्षक स्वप्निल जाधव यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले आहे,सर्व रक्तदात्याना सुरक्षा कवच हेल्मेट,सर्टिफिकेट तसेच एक झाड (रोप) वाटप करण्यात आले, रक्तदान शिबिरात तरुणांनी पुढाकार घेऊन शरीर सुदृढ व निरोगी आरोग्यासाठी सहभागी होऊन शरीर हेल्दी ठेवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे दौंड पोलीस उपविभागीय अधिकारी स्वप्निल जाधव यांनी मार्गदर्शन करताना सांगितले आहे,डॉक्टर वाघमोडे यांनी रक्तदान ही काळाची गरज आहे तरुणांनी ती ओळखली पाहिजे. कोणतेही निमित्त नसताना विठ्ठल होले आणि होलम सरांनी शिबिराचे आयोजन केले त्यांचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे,अशी चर्चा सुरू होती . राम होले आणि नाना शिंदे या तरुणाचा वाढदिवस त्यांनी रक्तदान करून साजरा केला,या शिबिरासाठी रोटरी ब्लड बँक चे रविंद्र फडतरे, नारायण पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे सहकार्य मिळाले आहे,तसेच रोटरी क्लब ऑफ दौंड अध्यक्ष सविता मनोहर भोर, सेक्रेटरी दीपक सोनवणे, रोटरॅक्ट क्लब ऑफ दौंड कॉलेज अध्यक्ष प्रज्वल बांडे, सेक्रेटरी हेमांगी बंब यांचे सहकार्य लाभले आहे.या शिबिरात SRPF ग्रुपचे जवान,दौंड पोलीस यांनीही रक्तदान करून मोलाचा संदेश दिला.

काष्टी,श्रीगोंदा,निमगाव खलु,दौंड, पाटस, गोपाळवाडी येथील तरुणांचा सहभाग लाभला,यावेळी दौंड पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव,उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक दत्तात्रय वाघमोडे,आप्पासाहेब पवार,प्रविण परदेशी, बागल सर,हरिभाऊ ठोंबरे,पो हवा नंदकुमार केकान,विजय पवार, ऍड.कावेरी गुरसाळ, ऍड रुपाली सदगर,मिसबा सय्यद,श्वेता रायकर, छायाताई, बबनराव लव्हे, उपसरपंच जयसिंग दरेकर, शिवाजी पवार, तंटामुक्ती अध्यक्ष भिमा चोरमले,राजेंद्र दोरड तसेच ग्रामस्थ व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते,यावेळी विठ्ठल होले आणि नागेश होलम सर यांचा DYSP स्वप्निल जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठ्ठल होले यांनी केले तर सूत्रसंचालन रवि पवार आणि किशोर टेकवडे यांनी केले,आभार होलम सर यांनी मानले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!