November 21, 2024 10:48 pm

वय काढाल, तर याद राखा..!

अपनी भाषा में पढ़े! Translate

माझ्या वयाबाबत वारंवार उल्लेख होतो आहे. माझे वय ८३ आहे. परंतु माझ्या
वयाकडे पाहू नका, हा गडी काय आहे, ते पाहा. वयाचा उल्लेख कराल तर
महागात पडेल, असा इशारा राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी
शनिवारी येथील जाहीर सभेत दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचा
भ्रष्टाचार खोदून काढावाच,

असे आव्हान त्यांनी दिले. छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर

शरद पवार यांची राज्यातील पहिलीच जाहीर सभा येवल्यात झाली.

यावेळी पवार म्हणाले की, आपला अंदाज कधीच चुकत नाही. परंतु, येवल्याबाबत तो चुकला.

मी येथे कुणावर टीका करायला नव्हे, तर येवलेकरांची माफी मागायला आलो आहे.

पुढील निवडणुकीत ही चूक सुधारू, तोंडात अंजीर, हातात खंजीर अशी माणसे बेभरवश्याची आहेत.
यावेळी खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार,
हेमंत टकले आदी उपस्थित होते.

‘ते’ निवडून येणार नाहीत
पक्ष कोणाचा हे जनताच ठरवेल. मात्र, जे म्हणतात आमचा पक्ष बेकायदा आहे.

ते राष्ट्रवादीच्या नावानेच मंत्री कसे झाले? या बेकायदा पक्षाच्या नियुक्त्या तुम्ही कशा केल्या?

असा सवाल करून शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांचा समाचार घेतला. त्याचबरोबर जे
पक्ष सोडून गेले, ते पुन्हा निवडून येणार नाहीत, असा दावाही त्यांनी नाशकातील माध्यमांशी संवाद साधताना केला.

पवार म्हणाले, कुणाला फेरविचार करायचा असेल तर हरकत नाही, पण त्या चिमण्या राहिल्या
नाहीत, या चिमण्यांनो… असे म्हणण्याची स्थिती नाही, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

शरद पवार यांनी पक्षीय अध्यक्षपदाचा स्वत:हून राजीनामा दिला पाहिजे
होता.
मार्गदर्शकाच्या भूमिकेत असते तर पक्षीय संघटनेला नक्कीच फायदा झाला असता.
कार्यकर्तेही एकवटले असते. मात्र अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन पुन्हा
जबाबदारी स्वीकारली. परंतु त्यांनी थांबायला हवं होतं, असे मत मंत्री
अनिल पाटील यांनी व्यक्त केले. दूध संघाच्या बैठकीनिमित्त ते जळगावात आले होते. त्यानंतर त्यांनी
पत्रकारांशी संवाद साधला.

सिंचन घोटाळा प्रकरणात अजित पवारांना क्लिनचीट मिळाली आहे.

त्यामुळे अशा जुन्या आरोपांना कुठलाही थारा नाही. पंतप्रधानांना कदाचित चुकीची माहिती दिली असावी.

त्यातून त्यांनी घोटाळ्याचा आरोप लावला असावा.

पूर्ण माहिती मिळाल्यावर ते नक्कीच भूमिका मांडतील, असा दावाही पाटील यांनी केला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!