करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) – छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त गुरुपौर्णिमे दिवशी श्री.नागेशजी दामोदरे (एस.एम.सी. सदस्य) यांनी स्वतःची मुलगी कृतिका हिच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांना पेन, पेन्सिल व वह्यांचे वाटप केले. सौ.पूजा दामोदरे,सौ.माया शिंदे, सौ.रावडे मॅडम,सौ.अडसूळ मॅडम व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.शाहू महाराजांनी दिन दलितांची व गोरगरिबांची न्याय व त्यांचे हक्क मिळवून दिले. आरक्षणाचे जनक म्हणून त्यांची ओळख आहे. आपणही त्यांचा आदर्श घ्यावा. असे मनोगत नागेशजी दामोदरे यांनी व्यक्त केले.सूत्रसंचालन मुख्याध्यापक यांनी केले व आभार श्री.दिपक जाधव सर यांनी मानले..!!