June 29, 2025 7:53 am

अमळनेर नगर पालिका आणि कॉन्ट्रॅक्टर यांचे पहिल्यच पावसात पितळ उघडे!

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेर नगर पालिका आणि कॉन्ट्रॅक्टर यांचे पहिल्यच पावसात पितळ उघडे!

अमळनेर प्रतिनिधी- काही महिन्यांपूर्वी भुयारी गटारीचे अमळनेर शहरात खोदकाम झाल्यानंतर खड्डे पडले होते. त्यावर मुरूम टाकून
जेमतेम बुजविले पण आता पावसाळा सुरू होताच बुजविलेले खड्डे पुन्हा मोठ्या प्रमाणात खचू लागले आहे. न्यू प्लॉट भागातील जयदीप राजपूत यांची नवी चारचाकी गाडी वाड्याच्या बाहेर पार्क केलेली असताना पहिला पाऊस रात्रभर झाल्याने रस्ता खचून गाडी एका बाजूने पूर्णपणे खड्डयात फसली गेली होती गाडी मालकाने त्वरित बाहेर गावाहून क्रेन मागवून ती गाडी बाहेर काढली, पण गाडीचे मोठे नुकसान झाले असून मोठा अपघात ही होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

विविध शाळांकडे जाणारा हा रस्ता असल्याने येथून नेहमीच लहान बालके जात येत असतात एखाद्या वेळी एखाद्या मुलगा या खड्यात पडून पूर्णपणे फसून जीवानिशी जाऊही शकतो एवढे खड्डे याठिकाणी पडले आहेत. वाहनधारक तसेच लहान मुले व वृद्धांना येथून वापरणे कठीण कठीण झाले आहे.

हा रस्ता प्रचंड रहदारीचा असून अनेक येथे अनेक शाळा देखील आहेत शाळकरी मुले मोठ्या प्रमाणात येथून वापरत असल्याने रस्त्याचे महत्व लक्षात
घेता नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीनी या रस्त्याचे त्वरित नूतनीकरण आणि डांबरीकरण करावे अशी मागणी संपूर्ण अमळनेर शहरातील नागरिक करीत आहेत.

पाच पावली पासून तर शिरुड नाका, वड चौक या भागात ही मोठया प्रमाणात पडलेत खड्डे पडले असून स्थानिक नागरिक संबंधित ठेकेदाराव आणि त्याच्यावर देखील कारवाई व्हावी अशी मागणी नागरिक करू लागले आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!