रोटरी क्लब ऑफ भिगवन च्या वतीने डॉक्टर हर्षवर्धन होरा यांना व्होकेशनल अवॉर्डने सन्मानित करण्यात आले…
(निलेश गायकवाड )
एक जुलै 2023 हा इंटरनॅशनल डॉक्टर डे म्हणून साजरा करण्यात येतो त्यानिमित्ताने बारामती येथील प्रसिद्ध छाती रोग तज्ञ डॉक्टर हर्षवर्धन होरा यांना रोटरी क्लब भिगवन ने वोकेशनल अवॉर्ड देऊन सन्मानित केले.
यावेळी भिगवन रोटरीचे संस्थापक अध्यक्ष श्री सचिन शेठ बोगावत यांनी डॉ हर्षवर्धन होरा यांच्या उल्लेखनीय कामगिरीचा आढावा घेतला डॉक्टर हर्षवर्धन होरा यांनी टीबी पेशंट वरती मोफत उपचार करतात तसेच त्यांचे रुग्णवशी असलेले काम हे उल्लेखनीय आहे आणि त्याबद्दल त्यांना रोटरी क्लब भिगवन ने vocational अवॉर्ड सन्मानित केले आहे असे सांगितले.
यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दौंड रोटरी क्लबचे डायनॅमिक प्रेसिडेंट डॉक्टर राजेश दाते उपस्थित होते यावेळी, श्री रणजीत भोंगळे व सर्व रोटरी मेंबर यांनी डॉ हर्षवर्धन व्होरा डॉ राजेश दाते तसेच रोटरी क्लबचे मेंबर डॉ भारत भरणे डॉ महेश गाढवे डॉ विशाल कोठारी डॉ अस्मिता भरणे डॉ शिवरानी खानावरे डॉ जयश्री मोरे व डॉअमोल खानावरे यांचा सन्मान केला व शुभेच्छा दिल्या .
रोटरी क्लबचे प्रेसिडेंट रणजीत भोंगळे यांनी मनोगत व्यक्त केले
अध्यक्ष भाषणामध्ये डॉक्टर राजेश दाते यांनी रोटरी क्लब करत असलेल्या कामांचा आढावा घेतला या कार्यक्रमाला रोटरी क्लबचे सेक्रेटरी श्री प्रदीप ताटे उपाध्यक्ष अतुल वाघ खजिनदार कुलदीप ननवरे पाटील रियाज भाई शेख, कमलेश गांधी, संजय चौधरी थॉमस मथाई औदुंबर हुलगे, प्रवीण वाघ, संजय रायसोनी नामदेव कुदळे संजय खाडे महेश शेंडगे प्रदीप वाकसे, माजी अध्यक्ष संपत बंडगर व ADV रुपेश झाडे,संदीप बोगावत तसेच सर्व रोटरी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष सवाने यांनी केले व माजी अध्यक्ष डॉक्टर अमोल खानावरे यांनी सर्वांचे आभार मानले.