June 28, 2025 5:11 pm

कोतकर समीक्षा प्रमोद ही फार्मास्युटीक्स विभागातुन विदयापीठातुन प्रथम, बोराडी फार्मसी महाविदयालयाची यशाची परंपरा कायम.. 

अपनी भाषा में पढ़े! Translate

बोराडी : क. ब. चौ. उत्तर महाराष्ट्र विदयापीठ, जळगाव यांच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या डिसेंबर 2022 चा एम. फार्मसीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून त्यात किसान विदया प्रसारक संस्थेच इंस्टिटयूट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन, बोराडी येथील विदयार्थ्यांनी कोतकर समीक्षा प्रमोद ही क.ब.चौ.उ.म.वि जळगाव फार्मास्युटीक्स विभागातुन प्रथम क्रमांक पटकवुन घवघवीत यश मिळविले आहे.

प्रथम वर्ष एम. फार्मसी फार्मास्युटीक्स या विषयाचा निकाल 100% लागला असुन त्यात कोतकर समीक्षा प्रमोद हिला 8.69 सी.जी.पी.ए. गुण मिळवुन प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली, वाघ नलिनी दिनेश हिला 8.54 सी.जी.पी.ए. गुण मिळवून व्दितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली तर माळी मोहिनी सुनिल हिला 8.38 सी.जी.पी.ए. गुण मिळवुन तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली.

प्रथम वर्ष एम. फार्मसी फार्मास्युटिकल क्वालिटी अशुरन्स या विषयाचा निकाल 100% लागला असुन त्यात महाजन भुषण सुरेश याला 8.38 सी.जी.पी.ए. गुण मिळवुन प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला, गावित हरीष अनिल याला 8.23 सी.जी.पी.ए. गुण मिळवून व्दितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला तर चौधरी योगेश डिगंबर याला 8.15 सी.जी.पी.ए. गुण मिळवुन तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला.

कोतकर समीक्षा प्रमोद ही क.ब.चौ.उ.म.वि जळगाव फार्मास्युटीक्स विभागातुन प्रथम क्रमांक

आल्याबदल तसेच फार्मास्युटीक्स व फार्मास्युटिकल क्वालिटी अशुरन्स या दोन्ही विभागाच्या विदयार्थ्यांचा सत्कार किसान विदया प्रसारक संस्थेचे अध्यक्ष व धुळे जिल्हापरीषदेचे माजी अध्यक्ष मा. डॉ. भाऊसो तुषारजी रंधे यांनी विदयार्थ्यांचा सत्कार करुन अभिनंदन केले.

विदयार्थ्यांच्या यशाबदल किसान विदया प्रसारक संस्थेचे अध्यक्ष व धुळे जिल्हापरीषदेचे माजी अध्यक्ष मा. डॉ. भाऊसो तुषारजी रंधे, सचिव मा. नानासो निशांतजी रंधे, खजिनदार ताईसो आशाताई रंधे, बोराडीचे उपसरपंच मा. आबासो राहुल जी. रंधे, कर्मवीर पथसंस्थेचे चेअरमन ताथ्यासो शशांकजी रंधे, नगरसेवक मा. बाबासो रोहीतजी रंधे, प्राचार्य डॉ. विकास व्ही. पाटील, उपप्राचार्य प्रा. कल्पेश वाघ, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी अभिनंदन केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!