करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) :- मुस्लिम समाजाची बकरी ईद दिनांक २९ जुन रोजी येत असुन या दिवशी करमाळा नगरपरिषदेने सकाळी सात वाजता उच्च दाबाने पाणी पुरवठा करावा अशी मागणी मुस्लिम समाजातील नागरीकांनी करमाळा नगरपरिषदेचे सहा, कार्यालयीन निरीक्षक बदे व पाणी पुरवठा अधिकारी फिरोज शेख यांच्या कड़े लेखी निवेदनाव्दारे केली आहे.
या लेखी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या चार पाच दिवसात करमाळा शहरातील पाणी पुरवठा विष्कळीत झाला असुन दिनांक २९ जुन रोजी आषाढी एकादशी व बकरी ईद एकाच दिवशी येत असल्यामुळे करमाळा शहरात ज्या भागात २९ जुन रोजी चा पाणी पुरवठा होणार नाही अश्या भागात टॅंकर ने पाणी पुरवठा करण्यात यावा दोन दिवसावर सण येत असल्यामुळे पाणी पुरवठा विभागाने विशेष काळजी घ्यावी असे लेखी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे सदर अर्जावर फारुक जमादार साजीद बेग आलीम खान खलील शेख आदी जणांच्या सह्या आहे.