June 29, 2025 9:27 am

सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या गणवेशाची रक्कम तत्काळ देण्यात यावी .गौतम कांबळे

अपनी भाषा में पढ़े! Translate

सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या गणवेशाची रक्कम तत्काळ देण्यात यावी .गौतम कांबळे
प्रतिनीधी – विकी ओहोळ
8446119158
दौंड: सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या गणवेशाची रक्कम तात्काळ देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांना मेलद्वारे केली आहे .
याविषयी गौतम कांबळे म्हणाले की ,शैक्षणिक वर्ष 2023-24 ला सुरुवात झालेली आहे .परंतु सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी गणवेशाची रक्कम अद्याप शाळांना मिळालेली नाही .त्यामुळे हे विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहिले आहेत .वंचित राहिलेल्या या विद्यार्थ्यांचा मनात इतर विद्यार्थ्यांच्या बाबतीत वेगळी भावना निर्माण होत आहे .इयत्ता १ ते इयत्ता ८ च्या सर्वच विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यात यावा ही संघटनेची मागणी शासनाने मान्य केलेली आहे परंतु अद्याप सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या गणवेशाची रक्कम शाळांना मिळालेली नाही . ही बाब खेदजनक आहे .तरी सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गणवेश देण्यासाठी त्वरित रक्कम उपलब्ध करून द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री शिंदे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे .या निवेदनाच्या प्रती देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री , दीपक केसरकर
शालेय शिक्षण मंत्री ,
गिरीश महाजन
ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य तसेच महाराष्ट्राचे मुख्य सचिव यांना पाठवलेल्या निवेदनात करण्यात आले आहे .यावेळी संघटनेचे राज्य महासचिव विठ्ठल सावंत उपस्थित होते .

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!