June 29, 2025 9:28 pm

निरा नरसिंहपुर मध्ये बाल वैष्णवांचा सोहळा रंगला.

अपनी भाषा में पढ़े! Translate

निरा नरसिंहपुर मध्ये बाल वैष्णवांचा सोहळा रंगला.
निरा नरसिंहपुर: दिनांक-25, प्रतिनिधी डॉक्टर सिद्धार्थ सरवदे.
पुणे जिल्ह्याचे शेवटचे टोक असणारे तीर्थक्षेत्र निरा नरसिंहपुर येथे जिल्हा परिषदेच्या प्रार्थमिक शाळेमध्ये पालखी सोहळा घेण्यात आला होता .या सोहळ्यामध्ये लहान लहान बाळ गोपाळ यांनी विठ्ठल रुक्मिणी तसेच संत व वारकऱ्यांच्या वेशभूषा करून एक अलौकिक असा सोहळा संपन्न केला.
निरा नरसिंहपूर हे गाव जुने पंढरपूर म्हणून ओळखले जाते. या गावाचा पौराणिक इतिहास आणि महात्म्य हे खूप मोठे आहे आणि लौकिक आहे. येथील जिल्हा परिषद प्रार्थमिक शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रेय देशमुख सर तसेच शिक्षिका सौ. वर्षा शिंदे मॅडम आणि शिक्षक सचिन कोळी सर, जयप्रकाश कांबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या वेशभूषा करून दिंडी सोहळ्याचे आकर्षण वाढवले. मुलांनी पालखीची मिरवणुकी संपूर्ण गावांमधून काढली. त्याच्यानंतर प्रवचन, भजन कीर्तन आणि रिंगणाचा कार्यक्रम गावातील वेगवेगळ्या चौकात घेण्यात आला आणि प्रसादानंतर कार्यक्रम संपला असे जाहीर केले. खरोखरच येथील शिक्षकांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे आणि आभार मानावे तेवढे थोडेच आहे. यांच्यामुळे आज संपूर्ण गावाला दिंडीचा आनंद घेता आला.
या कार्यक्रमासाठी नीरा नरसिंहपुर गावच्या सरपंच सौ. अश्विनी चंद्रकांत सरवदे, उपसरपंच सौ. रेणुका काकडे, सौ. अर्चना नितीन सरवदे,सौ. रूपाली उमेश कोळी, सौ. कोमल किशोर मोहिते, सौ. जयश्री राऊत, तंटामुक्त अध्यक्ष दशरथ राऊत, ह.भ.प.श्री.अंकुश तात्या रणखांबे, ह.भ.प.श्री. आनंद काकडे उर्फ अनुकाका, माजी सरपंच अण्णासाहेब काळे, माजी उपसरपंच विलास ताटे, सिने अभिनेते नितीन सरवदे, प्रसिद्ध उद्योगपती विजय सरवदे, प्रसिद्ध उद्योगपती पप्पू गोसावी, प्रसिद्ध बागायतदार किशोर तात्या मोहिते,दत्तात्रय कोळी, सुरेश धोत्रे, योगेश गोडसे, माजी उपसरपंच नरहरी काळे, माजी सरपंच जगदीश सुतार, राजेंद्र बळवंतराव, अतुल घोगरे, सागर इंगळे, शंकर राऊत, दिलीप सुतार, शिरसाट काका तसेच गावातील पुरुष व महिला भगिनी उपस्थित होत्या.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!