शिरपूर : तालुक्यातील शिंगावे येथे आमदार श्री काशिराम दादा पावरा यांच्या शुभहस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यात प्रामुख्याने नागरी सुविधा योजने अंतर्गत काँक्रिटीकरण साठी 15 लाखाचा निधी, नागरी सुविधा योजना अंतर्गत फेवर ब्लॉक साठी 10 लाख, ठक्कर बाप्पा योजने अंतर्गत सामाजिक सभागृह साठी 15 लाख, आमदार निधीतून आदिवासी समाज मंदिरा साठी 10 लाख व दलित वस्ती सुधारणा अंतर्गत 10 लाख निधी मंजूर करण्यात आला आहे.माजी शिक्षण मंत्री आ श्री अमरीशभाई पटेल, आमदार श्री काशीराम पावरा, सूतगिरणी चेअरमन श्री भूपेशभाई पटेल, युवा उद्योजक श्री चिंतनभाई पटेल, शिरपूर विधानसभा प्रमुख श्री प्रभाकर चव्हाण, मा नगरसेवक श्री अशोक कलाल, जि.प. उपाध्यक्ष श्री देवेंद्र पाटील यांच्या शिफारशीने वरील निधी मंजूर झाला आहे.
आमदार श्री काशीराम पावरा, जि.प. उपाध्यक्ष श्री देवेंद्र पाटील, पं.स. सदस्य चंद्रकांत दामोदर पाटील, सरपंच सौ मंजुळाबाई गुलाबराव पाटील, उपसरपंच चंद्रकांत पाटील उर्फ भुराभाऊ, ग्रा.पं. सदस्य रवींद्र पाटील, गोविंदा थोरात, मंजुळाबाई पवार, मा.सरपंच आनंद भिल, मनोहर भिल, धीरज पाटील, संभा पाटील, भारती पाटील, मंगला बाई पाटील, स्वाती पाटील, अनिता पाटील यांच्या शुभहस्ते भूमिपूजन करण्यात आले.या प्रसंगी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सूतगिरणी संचालक श्री मधुकर सोमजी पाटील, विकासो संचालक श्री आर एस पाटील, मा सरपंच श्री प्रताप आधार पाटील, भाजपा किसान मोर्चा तालुका अध्यक्ष श्री लोटन हिम्मतराव पाटील, विकास सोसायटी व्हा.चेअरमन श्री शशिकांत लक्ष्मण पाटील, मा सूतगिरणी संचालक श्री अशोक एकनाथ पाटील, मा सरपंच श्री शिरीष मनोहर पाटील, प्रा श्री अरुण पवार सर, ग्रामसेवक श्री अविनाश बैसाणे, मा उपसरपंच श्री सुनील पाटील, श्री जयवंत पाटील, बोरगांव सरपंच श्री योगेंद्रसिंग सिसोदिया, श्री सुभाष पाटील, श्री विजू पाटील, श्री छोटू पाटील, श्री मिलिंद निकम, श्री शत्रुघन भिल, श्री बंटी गोसावी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिरपूर तालुका सरपंच महासंघाचे संपर्क प्रमुख, भाजयुमो तालुका सरचिटणीस तथा शिंगावे उपसरपंच श्री चंद्रकांत पाटील उर्फ भुराभाऊ यांनी जि प उपाध्यक्ष श्री देवेंद्रदादांचे गावाचा विकास निधी मंजुरी साठी विशेष आभार मानले