लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव दौंड समितीच्या अध्यक्षपदी सागर सोनवणे तर उपाध्यक्षपदी उपेश तूपसौंदर्य यांची निवड.
प्रतिनिधी – विकी ओहोळ
8446119158
दौंड- येत्या एक ऑगस्ट 2023 रोजी येणार्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडीकरिता व व कार्यकारिणी निवडीकरिता 19 जून 2023 रोजी साठे नगर दौंड येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पूर्णकृती पुतळा समिती साठे नगर तसेच मातंग समाज एकीकरण समितीच्या संयुक्त विद्यमाने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावर्षीच्या जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सागर प्रकाश सोनवणे तर उपाध्यक्षपदी उपेश तातु तूपसौंदर्य यांची निवड सर्वानुमते करण्यात आली तसेच कार्याध्यक्ष म्हणून सिद्धार्थ कसबे, खजिनदार सोमनाथ आगलावे, सचिव विवेक मोरे यांच्यासह समितीचे सदस्य म्हणून जयंती उत्सव समितीचे माजी अध्यक्ष सुरेश तूपसौंदर्य, विनायक मोरे, सागर लोखंडे, संजय मोरे, दादा तूपसौंदर्य, अमित मोरे त्याच प्रमाणे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते महादेव ससाने, सगाजी आगलावे, मधुकर सोनवणे, दत्तू घोडे, अजय सकट, विकास शेलार, सुशांत वाघमारे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तसेच नवीन समितीच्या सदस्यांनी जयंती उत्सव साजरा करण्या साठी येणाऱ्या 1 ऑगस्ट पूर्वी दौंड शहर व तालुका मातंग समाजाचा मेळावा, आरोग्य शिबिर, क्रिकेट स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा तसेच डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले सदर बैठकीस मातंग समाजातील अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीचे सूत्रसंचालन आबा वाघमारे तर आभार प्रदर्शन चंदर गवारी यांनी केले.