जागतिक योग दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळा खोरवडी येथे योग दिन साजरा
प्रतिनिधी – विकी ओहोळ
8446119158
दौंड – जागतिक योग दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोरवडी येथील शाळेत योग दिन साजरा करण्यात आला .यावेळी शिक्षक व अनेक विद्यार्थ्यांनी सुंदर अशी योगासने करून दाखवली .योग दिनाचा कार्यक्रम साधारणतः दोन तास चालला .सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमात आनंदाने सहभाग घेतला .शाळेतील सहशिक्षक अभिजीत कोंडेजकर यांनी योगासनाचे महत्त्व सांगितले .
विद्यार्थ्यांकडून नियमित योगासने करून घेण्याचा शाळेतील सर्व शिक्षकांनी निर्णय केला .शाळेतील शिक्षिका नीता भद्रे ,साक्षी कोंडेजकर ,शितल कदम ,कुंदन सकट या शिक्षिकांनी योगासने करून दाखवली .यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शितल सोनवणे ,उपाध्यक्ष बाबासाहेब सकट ,शाळेचे मुख्याध्यापक गौतम कांबळे ,प्रशांत सकट ,अतुल सोनवणे ,गायत्री शिपकुले व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.