June 29, 2025 7:58 am

नवभारत इंग्लिश स्कूल मध्ये योगा दिन उत्साहात साजरा

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) :- जागतिक योगा दिनाचे औचित्य साधून करमाळा येथील नवभारत इंग्लिश स्कूल मध्ये योगा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सदरचा उपक्रम नवभारत इंग्लिश स्कूलच्या संचालिका सुनिता देवी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना नरारे सर, कदम सर, राजेंद्र वाशिंबेकर, रामचंद्र जगदाळे, भक्ति जगदाळे, हनुमानसिंग परदेशी, प्रवीणकुमार देवी आदि योग प्रशिक्षकांनी योग प्रशिक्षण देऊन योगाचे महत्त्व विषद केले. योगासनाचा समृध्द भारताचा इतिहास, योगामुळे होणारे फायदे, याबाबत विद्यार्थ्यां मध्ये जनजागृती केली. योगा दिनाच्या निमित्ताने वातावरणात नवचैतन्य निर्माण झाले होते व सर्व विद्यार्थांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
सदरचा उपक्रम राबविण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक मोहिते मॅडम, शिक्षक व सर्व कर्मचारी वर्गाने अथक परिश्रम घेतले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!