शिरपूर: शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथील दाखल करण्यात आलेल्या गुन्हा तील चार वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला गोपनीय माहितीवरून जेरबंद करण्यात शहर पोलिसांच्या शोध पथकाला यश आले आहे.
शिरपुर शहर पो.स्टे. चे पो.नि.ए.एस. आगरकर यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, शिरपुर शहर पो.स्टे. गुरनं. ३०९/२०१९ अ.जा. अ.ज. अ.प्र.का.क. ३ (१) (आर) (एस), भादवि कलम ३५३, ३३२,१४३,१४९,३७९,५११, ३२३, ५०४, ५०६, ४२६ सह महाराष्ट्र गौण खनिज अधिनियम कलम ३,४,७ व म.पो.का.क.३७(१)(३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हयात ४ वर्षापासून फरार असलेला आरोपी नामे- मंगलसिंग भिमराव भिल वय २५ रा. वरझडी ता. शिरपुर जि.धुळे हा वरझडी गावात आलेला असल्या बावत मिळालेल्या बातमीवरून वरिष्टांचे मार्गदर्शनाखाली शोध पथकाचे अंमलदार यांनी वरझडी गावात जावुन सापळा लावून सदर फरार आरोपीतास शिताफीने ताब्यात घेवुन शिरपुर शहर पो.स्टे. ला हजर करून उल्लेखनिय कामगिरी केली आहे.
दि. ०७/१२/२०१९ रोजी १४.३० वाजेचे सुमारास तक्रारदार- श्री. पंकज संतोष महाले, तलाठी सजा करवंद तहसिल कार्यालय शिरपुर जि.धुळे बरनमुद आरोपी हा त्याचे साथीदारांसह करवंद शिवारातील अरुणावती नदीचे पात्रात अवैधरित्या गौण खनिज (वाळु ) ची चोरी करुन ट्रॅक्टर मध्ये भरत असतांना तक्रारदार हे त्यांचे सोबतचे साक्षीदार अशांसह गौण खनिजाची चोरी पकडून कारवाई करण्यासाठी शासकीय काम करीत असतांना तक्रारदार हे अनुसूचीत जातोचे (चांभार जातीचे) असल्याचे माहित असतांना त्यांना जातीवाचक शिवीगाळ करून, हाताबुक्यांनी मारहाण करुन ते करीत असलेले शासकीय कामात अडथळा निर्माण करुन त्यांचे ट्रॅक्टर पळवून घेवून गेले बाबत तक्रारीवरून वरप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. संजय बारकुंड, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. किशोर काळे, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली शिरपुर शहर पो.स्टे. चे श्री. ए. एस. आगरकर, पोलीस निरीक्षक तसेच शोध पथकाचे पोहेकॉ ललित पाटील, लादूराम चौधरी, पोना/ मनोज पाटील, पोकों/विनोद अखडमल, गोविंद कोळी, योगेश दाभाडे, भटु सोळंके, प्रशांत पवार, सचिन वाघ व होमगार्ड शरद पारधी व मिथुन पवार अशांनी मिळून केली आहे.