June 29, 2025 8:20 am

शिंदखेडा येथे सोमवारी तहसील कार्यालयावर धडकणार शिवसेना (उठाबा) चा भव्य ‘शेतकरी जनआक्रोश शिंगाडे मोर्चा’..

अपनी भाषा में पढ़े! Translate

शिंदखेडा : शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी, शेतमालाला हमीभाव मिळण्यासह शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसंदर्भात शिंदखेडा येथे सोमवार दि. 26 जुन 2023 रोजी दुपारी 12.00 वाजता भगवा चौक, शिंदखेडा येथे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) तर्फे भव्य असा शेतकरी जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकणार असुन शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेना धुळे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांनी शेतकरी, कष्टकरी, कामगार यांना केले आहे.
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात श्री. साळुंके यांनी म्हटले की, दिवसेंदिवस शेतकऱ्यांनी पिळवणुक होत असुन शेतकऱ्यांचा मालाला हमीभाव मिळत नाही. कवडमोल भावाने शेतकऱ्यांस शेतमाल विकावा लागत आहे. शासनातर्फे अजुनही हमीभाव केंद्रे सुरु करण्यात आलेली नाही. शेतकऱ्यांवर आस्मानीसह सुलतानी संकट गडद होत चालले आहे. मायबाप सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास वेळ नाही. सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणीव करुन देण्यासाठी या “शेतकरी जनआक्रोश शिंगाडा मोर्चा” चे आयोजन करण्यात आले आहे. यात शेतकऱ्यांच्या मागण्या पुढीलप्रमाणे : –
तापी नदीवरील उपसा सिंचन योजना सुरु करा. शेतकऱ्यांना 18 तास अखंडीत विज पुरवठा करा. स्वामीनाथन आयोगाच्य शिफारशी लागू करा. पिक विम्याचे पैसे तात्काळ द्या. अतिवृष्टी व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई तात्काळ द्या. शेतकऱ्यांना पीककर्ज तात्काळ उपलब्ध करुन द्या. वाडी-शेवाडे धरणाच्या पाटचाऱ्यांची कामे तात्काळ करुन शेतकऱ्यांना मोबदला द्या. सिंचन विहीरी मंजुर करा. सिंदखेडा येथे 132 के.व्ही. विद्युत केंद्र मंजुर करा. वादळामुळे नुकसान झालेल्या शेतातील विद्युत खांब पुन्हा कार्यरत करा. शिंदखेडा व दोंडाईचा शहरातील शेतकऱ्यांना जलसिंचन विहीरींचा लाभ द्या. पीएम किसान योजना किंवा शासकीय अनुदानास बँकांनी होल्ड लावु नये. धुळे जिल्ह्याचा पोकरा योजनेत समावेश करा. शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान तात्काळ द्या, आदी मागण्या करण्यात आल्या असुन सदर मागणी संदर्भात शिवसेनेचे उपजिल्‍हाप्रमुख श्री.शानाभाऊ सोनवणे यांनी आमरण उपोषण केले. परंतु, शासन लक्ष देण्यास तयार नाही. शेतकऱ्यांचा जनआक्रोश बघता शिवसेनेच्या शिंगाडा मोर्चात मोठ्या संख्येने सहभागाचे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके, उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, जिल्हा संघटक मंगेश पवार, जिल्हा समन्वयक डॉ.भरत राजपुत, जिल्हायुवाधिकारी आकाश कोळी, उपजिल्हा संघटक भाईदास पाटील, कल्याण बागल, विधानसभा संघटक गणेश परदेशी, तालुकाप्रमुख गिरीश देसले, दोंडाईचा तालुका ईश्वर पाटील, माजी उपजिल्हाप्रमुख छोटू पाटील, माजी तालुकाप्रमुख विश्वनाथ पाटील, सर्जेराव पाटील, शहरप्रमुख संतोष देसले, माजी शहरप्रमुख नंदकिशोर पाटील, सागर देसले, तालुका संघटक डॉ.मनोज पाटील, शानाभाऊ धनगर, महिला आघाडी जिल्हा संघटक ज्योतीताई सिसोदे, तालुका संघटक ज्योतीताई पाटील, एस.टी.कामगार संघटनेचे आर.आर.पाटील आदींनी केले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!