अकोला दंगलीबाबत एस. पी.मोठा खुलासा
दंगल घडवुन आणणारे दोन्ही मुख्य आरोपीनां पोलीसांनी केली अटक
मृत्यु झालेल्या व्यक्ति बद्दल केले दु:ख व्यक्त
दंगल घडवुन आणणारे एकुण १४८ आरोपीतांना करण्यात आली अटक
अकोला : दिनांक १३.०५.२०२३ रोजी पोलीस स्टेशन रामदास पेठ, अकोला येथे मुस्लीम धर्माचे दैवता बाबत आक्षेपार्ह पोस्ट सोशल मिडीया चे इंस्टाग्राम पर वायरल करून मुस्लीम समाजाचे भावना दुखावल्या फिर्यादी ने तक्रार दिल्याने पोलीस स्टेशन रामदास पेठ अकोला येथे दिल्याने पोलीस स्टेशन रामदास पेठ अकोला येथे अपराध क्रमांक १९२ / २०२३ कलम १५३ (अ), २९५(अ) १८८, १२०(अ), ५०५ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता त्यानंतर मुस्लीम समाजाचे लोकांनी दिनांक १३.०५.२०२३ रोजी रात्री गैर कायद्याची मंडळी जमवुन कट कारस्थान रचुन ठिकठिकाणी जुने शहर परीसरातील, हरीहर पेठ, पोळा चौक व इतर ठिकाणी जाळ पोळ व दगड फेक करून हिंदु समाजाचे लोकांचे घरात घुसुन शासकीय व सार्वजनिक मालमत्तेचे मोठया प्रमाणात नुकसान करून लोखंडी पाईप व काठ्यांनी हिंदु समाजाचे लोकांना व पोलीसांना मारहाण केली. या मारहाणी मध्ये हरीहर पेठ भागातील एका इसमाचा मृत्यु झाला. व काही लोकांनी घडवुन आणलेल्या दंगली बाबत पोलीस स्टेशन जुने शहर येथे १) १५० / २०२३ कलम १४३ ते १४९, ३०७, ४३५, ३५३, ३३३, ३३६, ३३७, ४२७ भादंवि सह कलम ७ किमीनल लॉ अमेडमेंट सह कलम ३,४ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान कायदा २) १५१ / २०२३ कलम १४३, १४७, १४८, १४९, ४३५, ४३६, ४२७ भादंवि सह कलम ७ किमीनल लॉ अमेडमेंट सह कलम ३,४ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान कायदा ३) १५२ / २०२३ कलम ३०२, १४३, १४७, १४८, १४९, भादंवि ४) १५३ / २०२३ कलम १४३ ते १४९, ४३५, ४२७, २९५ भादंवि सह कलम ७ क्रिमीनल लॉ अमेडमेंट सह कलम ३, ४ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान कायदा अन्वये गुन्हे नोंद करण्यात आले असुन नमुद गून्हयात एकुण १०२ आरोपीतांना अटक करून सदर गुन्हयात ०६ अल्पवयीन (मुले) यांचा सहभाग असल्याचे तपास निष्पन्न झाल्याने त्यांना ताब्यात घेतले आहे. पोलीस स्टेशन रामदास पेठ येथे दाखल अपराध क्रमांक १९२ / २०२३ कलम १५३ (अ), २९५ (अ), १८८, १२०(अ), ५०५ भादंवि चे तपासात असे निष्पन्न झाले की सदर गुन्हयांतील फिर्यादी व एक इसम या दोघांनी एकमेकांचे मोबाईल फोन व्दारे सोशल मिडीया वर चॅटींग करून ती चॅटींग मुस्लीम समाजाचे सोशल मिडीया गृपवर प्रसारीत केली व वैयक्तीक चॅटींग सार्वजनिक केली. खोटी माहीती प्रसारीत करून कट कारस्थान रचुन मुस्लीम समाजाचे लोकांना एकत्र बोलावुन दंगल घडवुन आणली. सदर गुन्हयात ४४ आरोपी अटक करण्यात आले आहे. दंगल घडवुन आणणारे एकुण १४८ आरोपीतांना अटक करण्यात आली आहे.