तक्रारवाडी गावच्या सरपंच निवडणुकीत प्रशासनाचा हलगर्जीपणा ?
(- का लागत नाही निवडणुक प्रक्रिया? / कोण आहे याला जबाबदार)
(निलेश गायकवाड)
पुणे जिल्ह्यातील – इंदापूर तालुक्यातील तक्रारवाडी गावच्या सरपंच पदाच्या निवडणुकीकडे प्रशासनाचा हलगर्जीपणा दिसून येत आहे. सरपंचाने राजीनामा देऊन तब्बल दीड महिना पूर्ण होत असूनही प्रशासन मात्र निवडणुक जाहीर करत नसल्याने प्रशासकावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
गावचे सरपंच सतीश वाघ यांनी राजीनामे देऊन जवळपास दीड महिना होत आहे. वाघ यांनी ३१ मार्च २०२३ रोजी राजीनामा दिला. एप्रील महिन्यात मंजूर करण्यात झाला .त्या संदर्भातील सर्व कागदपत्रं पडताळून तो मंजूर करण्यात आला. त्यानंतर अपेक्षाप्रमाणे सरपंच पदाची निवडणूक लागणे गरजेची आहे .मात्र जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक प्रक्रियेची फाईल राजकीय आकासापोटी दाबून ठेवल्याचा आरोप काही ग्रामसदस्यांनी केला आहे .इंदापूर तालुक्यातील गोतोंडी येथील सरपंच पद तक्रारवाडीनंतर रिक्त होताच येथील निवडणूक प्रक्रिया पार पडली.मात्र तक्रारवाडी निवडणूक प्रक्रिया घेतली जात नसल्याने या सदस्यांचे म्हणणे आहे.
नियमानुसार सात दिवसात कार्यवाही करून लगेच नव्याने सरपंच पदाची निवडणुक प्रशासनाने लावणे आवश्यक आहे.
आज 20 मे तारीख असून अद्यापही निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला दिसत नाही. गावातील अनेक ग्रामस्थांनी निवडणुक जाहीर करण्याची मागणी केली, मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. प्रशासक कोणते कारण पुढे करत निवडणुक ढकलत आहे हा आता चर्चेचा विषय बनला आहे.
नेहमी तत्पर असलेले निवडणुक विभाग आता कासवाच्या गतीने ही प्रक्रिया का राबवत आहे, अशी चर्चा गावात झडत असुन आता प्रशासन याबाबात किती दिवस डोळे झाक करणार हा गावासाठी चिंतनाचा विषय बनला आहे.