June 29, 2025 3:26 am

नरडाणा, नंदुरबार वाया पुणे रेल्वे सुरु करावी मंत्री ना. रावसाहेब दानवे यांचाकडे धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांची मागणी…

अपनी भाषा में पढ़े! Translate

शिरपूर : नंदुरबार – मुंबई सेन्ट्रल गाडी क्र. १९४२६ ही गाडी नरडाणा / दोंडाईचा / नंदुरबार / कल्याण वाया पुणे पर्यंत करणे यावे अशी मागणी रेल्वेमंत्री ना. रावसाहेब दानवे यांचाकडे धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी मागणी केली आहे. जालना येथे (दि.२१ मे) रोजी धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी रेल्वेमंत्री ना. रावसाहेब दानवे यांची भेट घेवुन नरडाणा ते पुणे हि रेल्वे सुरु करावी अश्याचे निवेदन देवुन चर्चा केली असुन मंत्री ना. रावसाहेब दानवे यांनी यावेळी सांगितले की, धुळे व नंदुरबार जिल्हातुन पुणे जाण्यासाठी रेल्वे नसल्याचे मला जाणीव आहे लवकरच यावर निर्णय घेतला जाईल असे सांगितले असुन मंत्री ना. दानवे याविषयी सकारत्मक दिसुन आले. धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी रेल्वेमंत्री ना. रावसाहेब दानवे यांना दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, तसेच या गाडीचे नाव खान्देशवासीयांची मागणी म्हणून या गाडीचे नाव सावित्रीबाई फुले एक्सप्रेस देण्यात यावे अशी मागणी केली आहे. शिरपूर शहरातील व नंदुरबार मतदार संघातील नागरिकांची मागणी म्हणून सद्यस्थितीत नंदुरबार- मुंबई सेन्ट्रल ही गाडी नंदुरबारहून दुपारी २.०० वाजता मुंबईसाठी प्रस्थान होते. तसेच मुंबई सेन्ट्रलला रात्री ११:३० वाजता आगमन होते. मात्र या गाडीस खान्देशवासियांसाठी पुणे पर्यंत केल्यास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल. तसेच ही गाडी क्रमांक १९४२६ नंदुरबारहुन न निघता नरडाणा / शिंदखेडा / दोंडाईचा / नंदुरबार / नवापूर / बारडोली / बेस्तान / नवसारी / वापी / पालघर / वसई / कल्याण / लोणावळा मार्गे पुणे करावी म्हणजे नरडाणा- पुणे ही गाडी नरडाण्याहून संध्याकाळी ७ वाजता सोडावी तर ही गाडी पुण्याला सकाळी ७.०० वाजता पोहचेल. व पुण्याहून रात्री ९.०० वाजता प्रस्थान झाल्यावर नरडाणा येथे सकाळी ९.०० वाजता आगमन होईल. तसेच या गाडीचे नाव खान्देशवासीयांची मागणी म्हणून या गाडीचे नाव सावित्रीबाई फुले एक्सप्रेस देण्यात यावे अशी मागणी देखिल केली आहे. रेल्वेमंत्री ना. आश्विनी वैष्णव, खा. डॉ. हिना गावित, खा. डॉ. सुभाष भामरे यांना हि धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी यासंबंधीचे निवेदन पाठवले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!