जातोडे ते शिंगावे रस्त्याची दुरुस्ती करा :
बोरगांव ग्रामपंचायत तर्फे कार्यकारी अभियंत्यांना निवेदन
शिरपूर प्रतिनिधी : सुमन कंन्स्त्रक्शन शिरपूर या कंत्राटदाराने मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत 2018-19 मध्ये जातोडे ते शिंगावे या 4/23 किमी रस्त्याचे डांबरीकरण केले होते. 06 सप्टेंबर 2018 रोजी कार्यारंभ झालेल्या या रस्त्याचे काम सुरवातीपासूनच निकृष्ठ दर्जाचे झाले आहे.
बोरगांव ग्रामपंचायत चे सरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया यांनी धुळे कार्यकारी अभियंता श्री एस एस पगार यांच्या नावे असलेले निवेदन धुळे प्रकल्प अधिकारी श्री जी आर खैरनार यांना दिले. निवेदनात म्हटले आहे की, शिरपूर तालुक्यातील मुख्यमंत्री ग्राम सड़क योजने अंतर्गत मौजे जातोडे ते शिंगावे रस्त्याचे डांबरीकरण दि 06.09.2018 रोजी सुरु झाले होते व जे काम जवळ जवळ 1 ते दीड वर्ष चालले. आज या रस्त्याची अत्यंत दयनीय दुरावस्था झाली आहे. पूर्ण रस्त्यावर खड्डे पडले आहेत तसेच रस्त्याच्या कडेला झाडे-झुडपे वाढले आहेत. या रस्तावरून 10 ते 12 गावांतील ग्रामस्थांची रोजची ये-जा होते. तालुक्याच्या गावी शाळेत जाणाऱ्या लहान मुलांच्या गाड्या जातात. रस्त्यावरील खड्डे व वाढलेली झाड-झुडपांमुळे काही दुर्देवी घटना घडण्याची दाट शक्यता आहे.
सदरहू रस्त्याचा दुरुस्ती कालावधी हा ५ वर्षाचा आहे, जो अद्याप पूर्ण झालेला नाही. अनेक वेळा दूरध्वनी वरून संबंधित अभियंत्यांना रस्त्या दुरुस्तीकरण बद्दल विनंती केली गेली होती परंतु आम्ही असफल राहिलो असे निवेदनात म्हटले आहे.
धुळे कार्यकारी अभियंता श्री एस एस पगार यांना निवेदनाद्वारे विनंती केली गेली आहे की त्यांनी संबंधित कंत्राटदाराला योग्य त्या सूचना देऊन जातोडे ते शिंगावे रस्त्याचे दुरुस्तीकरण व झाड-झुडपे तोडण्या संदर्भात तात्काळ आदेश दयावेत.
या निवेदनाची प्रत माहितीत्सव आ.श्री. अमरीशभाई पटेल, आमदार श्री काशिराम पावरा, अधीक्षक अभियंता प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, मुंबई व नाशिक यांना देखील पाठविण्यात आले असल्याचे बोरगांव सरपंच योगेंद्रसिन सिसोदिया यांनी सांगितले.