नाशिक: गेल्या काही दिवसांपासून नाशिक मध्ये स्वयंघोषित तथाकथित भाईंची संख्या आणि त्यांच्या टोळ्या वाढू लागल्या आहेत. हे स्वयंघोषित भाई भाईगिरी करत कधी व्यावसायिकाला मारहाण करतात तर कधी कॉलनी भर रस्त्यामध्ये कोयते घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे तथाकथित भाई सध्या पोलीस तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठे डोकेदुखी ठरत आहेत. आज नाशिकमध्ये एका मिठाई व्यावसायिकाला जबर मारहाण करण्यात आले. सातपूर येथील अंबिका स्वीट्स येथे हा मारहाणीचा प्रकार घडला असून. फ्री मध्ये कोल्ड्रिंक आणि नाश्ता दिला नाही म्हणून पाच ते सहा जणांच्या टोळीने व्यावसायिकासह तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला देखील बेदम मारहाण केली. हा मारहाणीचा व्हिडिओ त्या स्वीट मार्ट मधील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला. सातपूरच्या महादेव नगर येथील अंबिका स्वीट्स या ठिकाणी पाच ते सहा जणांचे टोळके नाश्ता करण्यासाठी आलेले होते. नाष्टा केल्यानंतर पैसे देण्यावरून वाद झाला. फ्री मध्ये कोल्ड्रिंक आणि नाश्ता दिला नाही म्हणून थेट व्यावसायिक तसेच त्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाणी करण्यात आलेली आहे. या व्हिडिओमध्ये दहशत माजवणारे टोळके व्यावसायिकला मारहाण करताना दिसून येत आहे. घटनेची माहिती सातपूर पोलिसांना मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अवघ्या काही तासातच संशयितांना ताब्यात घेतले. तसेच अशाप्रकारे भाईगिरी करत दहशत माजवणारे टोळके आपल्या आजूबाजूच्या परिसरात आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन देखील सातपूर पोलिसांनी केले. सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या काही तासातच या टोळक्याला जेर बंद करण्यात आलेले असून पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब वाघ, पोलीस अंमलदार अनंता महाले, संभाजी जाधव, रोहिदास कनोजे यांच्या टीमने तातडीने ही कारवाई केली. दरम्यान काही दिवसांपूर्वी सातपूर येथील अभिषेक बेकरी या ठिकाणी भर दिवसा केक फ्री दिला नाही म्हणून कोयता काढत व्यावसायिकला मारहाण करण्यात आली होती यावेळी सातपूर पोलिसांनी या स्वयंघोषित तथाकतीत भाईंची परिसरातून दिंड काढत त्यांना चांगली अद्दल घडवली होती. यानंतर देखील आज घडलेल्या घटनेनंतर लगेचच सातपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि या टवळा खुराना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच अशा घटना पुन्हा घडल्यास किंवा नागरिकांना असे टवाळखोर आढळून आले असता त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन देखील सातपूर पोलिसांनी केले आहे.