June 29, 2025 3:56 pm

नवभारत इंग्लिश स्कूलमध्ये कथ्थक नृत्यालयाची स्थापना.

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड):-श्री गिरधरदासजी देवी प्रतिष्ठान संचलित नवभारत इंग्लिश मेडियम स्कूल व ट्विंकलिंग स्टार्स मध्ये महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून कथाकनृत्यालयाची स्थापना करण्यात आली. डॉक्टर वैष्णवी पाटील, डॉक्टर अपर्णा भोसले, सौ रेश्मा जाधव, सौ आरती दिवाण यांच्या सहकार्यातून कथक नृत्यलयाची स्थापना करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजसेवक श्री गणेशजी करेपाटील हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रशालेच्या सर्वेसर्वा सौ सुनीता देवी मॅडम, कथक शिक्षिका सौ कांचन पालकर सौ शिल्पा अंतापुरकर , श्री नरारे सर , मुख्याध्यापिका सौ सुनीता मोहिते मॅडम या होत्या. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. यावेळी श्री करे पाटील म्हणाले की, मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित ठेवण्यासाठी व आनंदी राहण्यासाठी नृत्य हे आवश्यक आहे तसेच कथक नृत्य किती महत्त्वाचे आहे याबद्दलही सांगितले. धनाड्य राष्ट्र म्हणून अमेरिकेकडे पहावे तर संस्कृती पाहताना महाराष्ट्राकडे पहावे असेही ते म्हणाले. करमाळा तालुक्याला संस्कृतीक माहेरघर बनवण्याचा प्रयत्न नवभारत इंग्लिश स्कूल मध्ये सुरू झाला आहे सत्या पासून सुरू झालेली परंपरा सौंदर्याकडे चाललेली आहे .शास्त्रीय संगीतातील अविभाज्य भाग म्हणून कथक नृत्याला मानले जाते आणि तेच कथक नृत्य आता आपल्या करमाळा शहरांमध्ये नवभारत इंग्लिश स्कूल मध्ये आपल्यांना उपलब्ध करून दिले जात आहे याबद्दल कौतुक ही केले. त्यानंतर कांचन पालकर व शिल्पा अंतापूरकर यांनी सरस्वती वंदना व तराना यांचे अप्रतिम असे सादरीकरण केले. प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंद तसेच विद्यार्थी व पालकवर्ग यांनीही या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!