June 30, 2025 5:14 am

दौंड ( पेडगाव ) याठिकाणी वंचित बहुजन आघाडी या पक्षाचा शाखा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.

अपनी भाषा में पढ़े! Translate

दौंड ( पेडगाव ) याठिकाणी वंचित बहुजन आघाडी या पक्षाचा शाखा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.
प्रतिनीधी – विकी ओहोळ
8446119158

दौंड – तालुक्यातील पेडगाव या ठिकाणी 29 एप्रिल रोजी वंचित बहुजन आघाडी या पक्षाचा शाखा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात, जल्लोषात साजरा आला यावेळी ढोल ताशा व फटाक्याच्या आतीश बाजीच्या गजरात, शाखा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
वंचित बहुजन आघाडी सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी दौंड शहरातून खोरवडी,आलेगाव, देऊळगाव ते पेडगाव अशी बाईक रॅली काढण्यात आली होती. दरम्यान देऊळगाव या ठिकाणी (संविधान पोळ, प्रवीण ओहोळ, सुशांत पवार) सिद्धार्थ युवक मंडळ व इतर सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या रॅलीचे आतिशबाजीच्या गजरात स्वागत केले, या वेळी सर्व देऊळगावकरांचे जाहीर आभार मानण्यात आले. पुढे ही रॅली पेडगाव या ठिकाणी पोहोचल्यानंतर शहरातून व तालुक्यातून आलेल्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचा पेडगावकरांनी ढोल ताशा आतिषबाजीच्या गजरात मोठ्या दिमाखात हा सत्कार समारंभ पार पडला, पुढेअश्विन वाघमारे यांच्या हस्ते शाखेच्या फलकाचे अनावरण झाले व नवनिर्वाचित शाखेच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करून शुभेच्छा देण्यात आल्या व बुद्ध वंदना घेण्यात आली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीला प्रारंभ झाला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे शहर व तालुका कार्यकारणी उपस्थित होते, ता सचिव अजिंक्य गायकवाड, शहराध्यक्ष सैफ मणियार, शहर सचिव राहुल नायडू, उपाध्यक्ष संतोष कांबळे, शहर संघटक बबलू जगताप,शहर संघटक शिवा खरारे, शहर संघटक निलेश मिसाळ, शहर महासचिव अक्षय शिखरे, सा.मा.प्रभाकर भाऊ पोते, शहर सचिव सोहन शिंदे, शहर सचिव शुभम वानखेडे,शहर सचिव अनिकेत जाधव, शहर संघटन दीपक सोनवणे, अतितोष वाघमारे,गौरव शिंदे,राजरत्न शिंदे, करण खांडे, यश भालसेन. इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत हा भव्य सोहळा पार पडला या वेळी देऊळगाव राजे गावातील कार्यकर्ते , ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पेडगाव शाखेचे – अध्यक्ष रुपेश घोडके, उपाध्यक्ष बाळासाहेब घोडके, उपाध्यक्ष स्वप्नील शिंदे, महासचिव विकास शिंदे,सचिव सुदाम घोडके, खजिनदार महेश जगताप, व्यवस्थापक राजू घोडके पेडगाव शाखेचे सर्व पदाधिकारी सदस्य आपणास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी पेडगाव येथील ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!